Monday, March 09, 2026 08:37:31 AM

Electricity Bill Zero Tips: उन्हाळा येतोय! जास्तीच्या वीज बिलामुळे टेन्शनमध्ये आहात का? 'या' एका युक्तीने लाईट बिल येईल शून्य

उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच वीज बिलांचा ताण सर्वसामान्यांची झोप उडवत आहे. मात्र, आता तुम्हाला वाढत्या बिलांची चिंता करण्याची गरज नाही.

electricity bill zero tips उन्हाळा येतोय जास्तीच्या वीज बिलामुळे टेन्शनमध्ये आहात का या एका युक्तीने लाईट बिल येईल शून्य

Electric Bill Zero Tips: उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच वीज बिलांचा ताण सर्वसामान्यांची झोप उडवत आहे. मात्र, आता तुम्हाला वाढत्या बिलांची चिंता करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने सुरू केलेली 'प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना' तुमच्या घराचे वीज बिल कायमचे शून्यावर आणू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी या योजनेची घोषणा केली असून, याद्वारे घरांच्या छतावर सौर पॅनेल (Solar Panels) बसवण्यासाठी मोठे अनुदान दिले जात आहे.

काय आहे ही विशेष योजना?
पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत देशातील 1,00,00,000 कुटुंबांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण तर होईलच, पण सरकारचे दरवर्षी वीज खर्चात सुमारे 75,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे. या योजनेमुळे सर्वसामान्य कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळवणे शक्य होणार आहे.

सरकारकडून मिळणारे भरघोस अनुदान (Subsidy)
सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकार खर्चाच्या सुमारे 40 टक्क्यांपर्यंत अनुदान देते. खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
1 किलोवॅट सिस्टमसाठी: 30,000 चे अनुदान.
2 किलोवॅट सिस्टमसाठी: 60,000 चे अनुदान.
3 किलोवॅट किंवा त्याहून अधिक: कमाल 78,000 पर्यंत अनुदान.
या अनुदानामुळे सौर ऊर्जा संच बसवण्याचा सुरुवातीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो आणि भविष्यातील वीज बिल पूर्णपणे शून्य होते.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे अनिवार्य आहे:

- आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा.
- उत्पन्नाचा दाखला.
- अलीकडील वीज बिल.
- रेशन कार्ड.
- बँक पासबुक (अनुदानाची रक्कम जमा होण्यासाठी).
- मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो.

हेही वाचा - Income Tax Notice: करदात्यांचं टेंशन वाढलं! आयकर विभागाची कोट्यवधी लोकांना NUDGE नोटीस, काय करावे आणि काय करू नये?

अशी करा ऑनलाईन नोंदणी

प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर (pmsuryaghar.gov.in) भेट द्या.
तेथे 'Apply for Rooftop Solar' निवडा आणि आपला मोबाईल नंबर व वीज ग्राहक क्रमांक नोंदवून लॉगिन करा.
तुमच्या घराचा तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा.
तांत्रिक तपासणीनंतर सोलर पॅनेल बसवले जातील आणि अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.


सम्बन्धित सामग्री