Saturday, June 14, 2025 03:29:41 AM

पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला नागपुरात आणलं

पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला नागपुरात आणलं. सुनीताने एलओसी ओलांडून बेकायदेशीर पाकिस्तानात प्रवेश केला होता. मात्र आता सुनीता जामगडेची कसून चौकशी होणार आहे.

पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला नागपुरात आणलं

नागपूर: पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला नागपुरात आणलं. सुनीताने एलओसी ओलांडून बेकायदेशीर पाकिस्तानात प्रवेश केला होता. मात्र आता सुनीता जामगडेची कसून चौकशी होणार आहे. 

पाकिस्तानात गेलेल्या सुनीताला बुधवारी पोलिसांनी नागपुरात आणलं आहे. एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेची कसून चौकशी होणार आहे. सुनीता जामगडे हिने हेरगिरी केली का? नागपूरातील संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, रेल्वे स्टेशन याबाबत संवेदनशील माहिती दिली का? या तपासासाठी नागपूर पोलीस सुनीता जामगडेची कसून चौकशी करणार आहेत. सुनीता जामगडे प्रकरणात नागपूर पोलिसांसह एटीएस (ATS) आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा या चौकशीत सहभागी होणार आहेत. भारत पाकिस्तान तणावाची स्थिती असताना नागपूरातील सुनीता जामगडे ही महिला बेकायदेशीरपणे पाकिस्तानात गेली होती. 

हेही वाचा : : किडनी रॅकेट प्रकरणी डॉ. अजय तावरेला पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

नागपुरातील महिलेकडून हेरगिरीचा प्रयत्न? 
9 मे रोजी नागपूरची सुनीता जामगडे कारगिलमध्ये गेली होती. 36 वर्षीय सुनीताने 15 वर्षांच्या मुलासह कारगिलच्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. 14 मे रोजी मुलाला हॉटेलमध्ये एकटं सोडून महिला एलओसीपार केली. त्यानंतर सुनीता एलओसीपार पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात होती. 26 मे रोजी पाक सुरक्षा यंत्रणांकडून सुनीताला बीएसएफच्या ताब्यात देण्यात आले. याआधीही महिलेकडून दोनदा नियंत्रण रेषा ओलांडल्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सुनीतानं हेरगिरी करत संवेदशनील माहिती दिली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इंटरनेटद्वारे ओळख झालेल्या पाद्रीला भेटण्यासाठी गेल्याची माहिती तिने दिली आहे.  


सम्बन्धित सामग्री