नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स जवळपास नऊ महिन्यांच्या अंतराळ मोहिमेनंतर 19 मार्च रोजी पृथ्वीवर परत येणार आहेत. स्पेस एक्सचे (SpaceX) ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडा किनाऱ्यावर उतरणार आहे. त्यांचे अंतराळयान 18 मार्च रोजी आयएसएसपासून (ISS) वेगळे होईल आणि 19 मार्च रोजी समुद्रात उतरेल. या संपूर्ण प्रक्रियेचे नासातर्फे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. सुनीता यांचं परतीचा काऊंटडाऊन आता सुरू झाला आहे.
अंतराळवीर सुनीता आणि बुच विल्मोर हे दोघेही आता स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परततील. दोघांनी गेल्या वर्षी 5 जून रोजी केप कॅनवेरल येथून बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले. ते आठ दिवसांच्या मिशनसाठी गेले होते. मात्र अंतराळयानामधून हीलियमची गळती आणि वेग कमी झाल्यामुळे ते जवळपास नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकले आहेत. त्यांच्या पृथ्वीवरील आगमनाची सर्वांनाच आतुरता होती. अखेर आता ते पृथ्वीवर परत येणार आहेत.
हेही वाचा : ‘औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे?’हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली - एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळांवर घणाघात
अंतराळ स्थानकात सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे ५ जून २०२४ रोजी गेले होते. त्यांचा मुक्काम केवळ एका आठवड्यासाठी होता. मात्र त्यांना तब्बल ९ महिने त्या ठिकाणी थांबावे लागले. या ठिकाणी राहणे खूपच अवघड आहे. कारण अंतराळ स्थानक २८ हजार १६३ किलोमीटर वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी २४ तासात १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. त्या ठिकाणी ९० मिनिटांत दिवस संपतो.
मात्र आता 19 मार्चला सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार आहे. दिर्घ प्रतिक्षेनंतर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत.