भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कालची रात्र दिवाळी साजरी करण्यासारखी ठरली आहे. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 96 धावांनी दणदणीत विजय तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाची ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. भारताने दिलेल्या 256 धावांच्या अवाढव्य लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंड अवघ्या 159 धावांवर गारद झाला. यावेळी भारताच्या फलंदाजांकडून संजू सॅमसन, अभिषेक शर्म आणि ईशान किशन यांनी जोरदार प्रदर्शन केलं आहे. तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह आणि अक्षय पटेलच्या फिरकीची जादू मैदानावर चालली. न्यूझीलंडच्या फलंदाजीबद्दल बोलायच झालं तर न्यूझीलंडकडून टिम सेफर्ट याने 52 धावांच अर्धशतक केल्याचे पाहायला मिळाले. एकंदरीत पाहायच झालं तर भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा संघ पत्त्यासारखा कोसळला.
हेही वाचा- Arshdeep Singh-Daryl Mitchell Controversy : अर्शदीपची ‘ती’ कृती अन् मिशेलला राग अनावर! काही सेकंदांसाठी मैदानातील वातावरण तापलं; नेमकं काय घडलं?
यादरम्यान सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारताने न्यूझीलंड विरुद्ध दणदणीत विजय मिळवत आयसीसी टी-20 विश्वचषकात नवा इतिहास घडवला. सूर्यकुमार यादवची प्रतिमा, भारताच्या टी-20 विश्वचषक 2026 च्या विजयाचे निर्णायक चित्र बनली आहे. सामन्यापुर्वी क्रिकेटप्रेमींनी स्टेडीयमबाबतची भीती व्यक्त केली. क्रिकेटप्रेमींनी या स्टेडीयमला पनवती म्हटलं, असं असताना टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकताच कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या पदाला जागला. त्याने घरच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पवित्र मैदानावर गुडघे टेकून, क्रिकेट मैदानाची मूठभर माती कपाळाला लावली. त्याची आपल्या देशाच्या मातीप्रती प्रेम आणि आदर भावना पाहून चाहत्यांची सूर्यकुमार यादववर प्रेमाचा वर्षावर केला आहे.