Monday, May 11, 2026 11:54:28 AM

Vijay Thalapathy : पहिल्याच निवडणुकीत शंभरी पार; पण थलपतीच्या एका चुकीने पक्षाला....

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजयचा पक्ष असलेल्या टीव्हीकेने जवळपास सहा दशकांपासून सुरू असलेल्या द्रविड पक्षांच्या वर्चस्वाला संपवले आहे.

vijay thalapathy  पहिल्याच निवडणुकीत शंभरी पार पण थलपतीच्या एका चुकीने पक्षाला

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजयचा पक्ष असलेल्या टीव्हीकेने जवळपास सहा दशकांपासून सुरू असलेल्या द्रविड पक्षांच्या वर्चस्वाला संपवले आहे. अभिनेता ते नेता बनलेले सी. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने 108 जागांवर विजय मिळवत विधानसभा निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पहिल्यांद निवडणुकीत या पक्षाने दमदार कामगिरी केली असून शंभरहून अधिक जागा जिंकत टीव्हीकेने राज्याच्या राजकारणात आपली मजबूत उपस्थिती नोंदवली आहे. मात्र थलापती विजयची एक चूक पक्षाला भारी पडणार आहे. यामुळे विजयला एका जागेचे नुकसान सहन करावे लागत आहे.

टीव्हीकेनं निवडणुकीत एकूण 108 जागांवर विजय मिळवला. या जागा डीएमके आणि एआयएडीएमकेपेक्षा खूप जास्त आहेत. या मोठ्या विजयाच्यानंतर देखील टीव्हीके स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमतापासून थोडी दूर आहे. 234 सदस्यीय विधानसभा मध्ये स्पष्ट बहुमतासाठी 118 जागांची गरज आहे. सध्या टीव्हीकेकडे 108 जागा असून बहुमतापासून अजूनही ते 10 जागा दूर आहेत. 

हेही वाचा : Ram Gopal Verma : थलपतीच्या 'विजया'नंतर राम गोपाल वर्मांची 'ती' पोस्ट; करुणानिधींच्या फोटोसह केली बेधडक टिप्पणी

आता त्यांच्यी आणखी एक जागा कमी झाली आहे. टीव्हीके प्रमुख विजय यांनी दोन मतदारसंघांतून विजय मिळवला आहे. एक पेरंबूर आणि दुसरी तिरुची ईस्ट. नियमानुसार त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे पक्षाची संख्या 108 वरून 107 वर आली आहे. तसेच सरकार स्थापन झाल्यास एका आमदाराला विधानसभा अध्यक्ष (स्पीकर) बनवावे लागेल. स्पीकर सामान्यतः मतदान करत नाही. त्यामुळे सभागृहातील पक्षाची प्रभावी संख्या आणखी कमी होणार आहे. त्यामुळे मॅजिक फिगर गाठण्यासाठी पक्षाला आता १० ऐवजी १२ जागांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. 

या निवडणुकीत टीव्हीकेनं 108 जागा, डीएमकेनं 59, एडीएमकेनं 47 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठीचे बहुमत मिळालेले नाही. तसेच काँग्रेसने 5 जागा जिंकल्या असून डावे पक्ष सीपीआय आणि सीपीआय (एम) यांना प्रत्येकी 2-2 जागा मिळाल्या आहेत. 


सम्बन्धित सामग्री