Friday, December 05, 2025 01:39:51 AM

Technical Glitch in ATC Server: दिल्ली विमानतळावर ATC सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड; 25 उड्डाणे टेकऑफसाठी प्रतीक्षेत

एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सर्व्हर अचानक बंद पडल्याने सुमारे 25 विमानांचे टेकऑफ थांबवण्यात आले असून, अनेक उड्डाणे उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.

technical glitch in atc server दिल्ली विमानतळावर atc सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड 25 उड्डाणे टेकऑफसाठी प्रतीक्षेत

Technical Glitch in ATC Server: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी दुपारी मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने विमान वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सर्व्हर अचानक बंद पडल्याने सुमारे 25 विमानांचे टेकऑफ थांबवण्यात आले असून, अनेक उड्डाणे उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सर्व्हरमध्ये बिघाड दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला आणि तांत्रिक टीम त्यावर उपाययोजना करत आहे. या त्रुटीचा फटका सर्व प्रमुख एअरलाइन्स इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा, स्पाइसजेट आणि गोएअर बसला आहे.

हेही वाचा - Bihar Election 2025 First Phase : बिहारमध्ये विक्रमी मतदान! संध्याकाळी 5 पर्यंत 60 टक्के मतदारांचा सहभाग, मागच्या वेळचा रेकॉर्ड मोडला

इंडिगोच्या विमानांमध्ये घोषणा करून प्रवाशांना विलंबाबाबत माहिती दिली जात आहे, मात्र किती वेळात सेवा पुन्हा सुरळीत होईल याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेले नाही. बुधवारी एअर इंडियाच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने दिल्ली विमानतळावर मोठी अडचण निर्माण झाली होती. एक तासाहून अधिक वेळेपर्यंत चेक-इन प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यानंतर मॅन्युअल पद्धतीने प्रवाशांचे चेक-इन सुरू करण्यात आले होते.

हेही वाचा - National Public Health Emergency : तब्बल 22 लाख मुलांना फुफ्फुसांच्या समस्या; राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करा!, सर्वोच्च न्यायालयात याचिका

आज पुन्हा झालेल्या या बिघाडामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, तर विमानतळावर गर्दी वाढत चालली आहे. एटीसी सर्व्हर पुन्हा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास विमानतळ प्रशासनाने व्यक्त केला आहे.


सम्बन्धित सामग्री