अमरनाथ यात्रेपूर्वी पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला, गोळीबारात एकाचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटावर गोळीबार केला. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून जवानांनी डोंगराळ भागात शोध मोहीम तीव्र केली आहे.

अमरनाथ यात्रेपूर्वी पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला, गोळीबारात एकाचा मृत्यू
Edited Image

पहलगाम: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटावर गोळीबार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून जवानांनी डोंगराळ भागात शोध मोहीम तीव्र केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी घटनास्थळाचा ताबा घेतला आहे आणि डोंगराळ भागाला वेढा घातला आहे. त्याचवेळी, जखमी पर्यटकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

पर्यटकाच्या डोक्यात झाडली गोळी – 

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले. एका महिलेने फोनवरून पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, माझ्या पतीच्या डोक्यात गोळी लागली आहे, तर हल्ल्यात इतर सात जण जखमी झाले आहेत. महिलेने तिची ओळख उघड केलेली नाही. परंतु, महिलेने जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा –  गुजरातमधील अमरेलीमध्ये प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले; पायलटचा मृत्यू

परिसरात शोध मोहीम सुरू – 

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे जवान घटनास्थळी उपस्थित आहेत. लष्कराचे अधिकारीही अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे 15 वे कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल प्रशांत श्रीवास्तव हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचले आहेत. दहशतवादाविरुद्ध कारवाई सुरू झाली आहे.

हेही वाचा – झारखंडमधील बोकारोच्या जंगलात चकमक: 8 नक्षलवादी ठार, मोठा शस्त्रसाठा हस्तगत

अमरनाथ यात्रेपूर्वी करण्यात आला हल्ला – 

दरम्यान, अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होत आहे. अशा परिस्थितीत पर्यटकांना लक्ष्य करणे हा दहशतवाद्यांचा अजेंडा असल्याचं दिसत आहे. या हल्ल्यावरून असे दिसते की दहशतवादी अमरनाथ यात्रेवर परिणाम करू इच्छितात. सध्या पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिसराला वेढा घातला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number