Tamil Nadu CM Oath Ceremony: तामिळनाडूमध्ये ‘थलपती’चं सरकार; विजय यांनी केला सत्तास्थापनेचा दावा, ‘या’ दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

विजय यांनी आज 'लोक भवन' येथे राज्यपालांची भेट घेतली आणि आपल्याकडे आवश्यक बहुमत असल्याचे पत्र सादर केले.

Tamil Nadu CM Oath Ceremony: तामिळनाडूमध्ये ‘थलपती’चं सरकार; विजय यांनी केला सत्तास्थापनेचा दावा, ‘या’ दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Tamil Nadu CM Oath Ceremony: तामिळनाडूच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक वळण आले आहे. ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे प्रमुख आणि लोकप्रिय अभिनेते विजय यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा आपला औपचारिक दावा सादर केला आहे. पक्षाकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आला असून, विजय यांच्या या पावलामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

राजभवनावर हालचाली आणि सत्तास्थापनेचा दावा
प्राप्त माहितीनुसार, विजय यांनी आज ‘लोक भवन’ येथे राज्यपालांची भेट घेतली आणि आपल्याकडे आवश्यक बहुमत असल्याचे पत्र सादर केले. या भेटीनंतर विजय उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे समर्थकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

शपथविधीसाठी ‘वेळ’ निश्चित
विजय यांचा शपथविधी सोहळा उद्या, म्हणजेच 7 मे 2026 रोजी पार पडणार आहे. राज्यपालांनी निश्चित केल्यानुसार, सकाळी 10:00 ते 11:15 हा विशेष कालावधी शपथविधीसाठी निवडण्यात आला आहे. याच वेळेत ते तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

हेही वाचा – Rahul Gandhi PA fraud : राहुल गांधींचा पीए असल्याचं भासवून काँग्रेस नेत्यांना गंडा; तिकीट आणि पदाचं आमिष दाखवून लुटले लाखो रुपये

नेहरू स्टेडियमवर रंगणार ऐतिहासिक सोहळा
तामिळनाडूच्या या नव्या नेतृत्वाचा शपथविधी चेन्नईच्या प्रसिद्ध नेहरू स्टेडियमवर पार पडणार आहे. या स्टेडियमची आसनक्षमता 5,000 इतकी असून, जनतेला या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होता यावे यासाठी हे ठिकाण निवडण्यात आले आहे. स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांना सर्व तयारी पूर्ण करून उद्या सकाळी 6:00 वाजेपर्यंत स्टेडियम प्रशासनाकडे सुपूर्द करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासकीय तयारी आणि नियोजित वेळ
नियोजित कार्यक्रमानुसार, विजय सकाळी 10:00 वाजेपूर्वीच स्टेडियमवर पोहोचतील. त्यानंतर 10:00 ते 11:30 या दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा मुख्य सोहळा पार पडेल. तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात एका दिग्गज अभिनेत्याचा मुख्यमंत्री म्हणून होणारा हा उदय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number