Friday, June 12, 2026 10:58:33 PM

Vijay Thalapathy Oath Ceremony: विजय यांच्या शपथविधीला अभिनेत्री तृषा कृष्णनची विशेष हजेरी; 'या' एका प्रतिक्रियेने वेधले सर्वांचे लक्ष

तामिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक क्रांती घडवत 'थलापती' विजय आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

vijay thalapathy oath ceremony विजय यांच्या शपथविधीला अभिनेत्री तृषा कृष्णनची विशेष हजेरी या एका प्रतिक्रियेने वेधले सर्वांचे लक्ष

तामिळनाडू: रुपेरी पडद्यावर तिच्या अभिनयाने आणि अ‍ॅक्शनने चाहत्यांना वेड लावणारा 'थलापती' विजय आता खऱ्या आयुष्यातील 'सरकार' बनून जनसेवेसाठी सज्ज झाला आहे. तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या पर्वाची पहाट झाली असून, चित्रपटसृष्टीतून संन्यास घेतल्यानंतर राजकारणात उतरलेल्या विजय यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाचे शिखर गाठले आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटल्यानंतर, अखेर सत्तास्थापनेचा पेच सुटला असून आज थलापती विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या ऐतिहासिक क्षणामुळे संपूर्ण चेन्नईत उत्साहाचे उधाण आले आहे.

विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या नवख्या पक्षाने 2026 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने प्रस्थापित राजकीय पक्षांना धूळ चारली, त्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. राजकारणात 'नवखा' असूनही विजयने टाकलेले डावपेच आणि तमिळ जनतेने दिलेला कौल यामुळे आज चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर विजयाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. स्टेडियमबाहेरचे वातावरण केवळ राजकीय नसून, ते एका मोठ्या उत्सवासारखे भासत आहे, जिथे चित्रपटसृष्टीतील जुन्या आठवणी आणि राजकारणातील नव्या आशांचा एक अनोखा संगम पाहायला मिळत आहे.

या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहत आहेत, मात्र यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधले ते दाक्षिणात्य सुंदरी तृषा कृष्णन हिने. विजय आणि तृषा यांची पडद्यावरची जोडी प्रेक्षकांना नेहमीच भावली आहे, आणि आज विजयच्या या मोठ्या दिवशी तृषाने आवर्जून हजेरी लावली आहे. अत्यंत साध्या वेशात पण तितक्याच आपुलकीने ती सोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाली. चेन्नईतील तिच्या घरातून निघताना तिने प्रसारमाध्यमांशी मोजक्या शब्दांत संवाद साधला. "तामिळनाडूसाठी हा खूप मोठा दिवस आहे, मी या क्षणाची उत्सुकतेने वाट पाहत आहे," असे म्हणत तिने विजय यांना मूक शुभेच्छाच दिल्या.

हेही वाचा: Yuvraj Singh Viral Video: भर कार्यक्रमात युवराज सिंगच्या खांद्याला अभिनेत्रीने लावला हात; युवी पाजीचा दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर तर सध्या तृषा कृष्णनच्या एका इन्स्टाग्राम 'स्टोरी'ची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या क्षणी विजय मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या दिशेने पाऊल टाकत होते, त्याच सुमारास तृषाने एक सूचक पोस्ट शेअर केली. यामुळे इंटरनेटवर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हा केवळ एक योगायोग आहे की विजय यांच्या या ऐतिहासिक विजयावर दिलेली एखादी मूक प्रतिक्रिया, यावरून चाहते आता आपापले अंदाज बांधत आहेत. या पोस्टमुळे सोहळ्यातील कुतूहल अधिकच वाढले आहे.

तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात चित्रपटसृष्टीतील ताऱ्यांनी नेहमीच मोठी भूमिका बजावली आहे. एम.जी. रामचंद्रन, जयललिता यांच्यानंतर आता थलापती विजय हा वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटगृहातील शिट्ट्या आणि टाळ्यांचे रूपांतर आता जनमताच्या कौलात झाले आहे. प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढत एका अभिनेत्याने मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली ही मजल भारतीय लोकशाहीतील एका नव्या प्रयोगाची नांदी मानली जात आहे.

आजचा हा दिवस केवळ एका पक्षाचा विजय नसून, तामिळनाडूच्या जनतेने बदल घडवण्यासाठी दाखवलेली जिद्द आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणारा हा शपथविधी सोहळा म्हणजे ग्लॅमर आणि सत्ताकारणाचा असा मेळ आहे, जो येणाऱ्या अनेक दशकांसाठी स्मरणात राहील. आता थलापती विजय त्यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' पक्षाच्या माध्यमातून तामिळनाडूचा विकास कसा साधतात आणि जनतेच्या अपेक्षांना कसे उतरतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: Monsoon Arrival Dates: उकाड्यानं हैराण झालेल्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' तारखांसह मान्सून वेळेआधीच धडकणार, वाचा नवा अंदाज

 


सम्बन्धित सामग्री