Arvind Kejriwal: ‘भाजपने पुन्हा एकदा पंजाबी जनतेचा…’; राघव चढ्ढांच्या सोडचिठ्ठीनंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, भाजपवर साधला निशाणा

राघव चढ्ढा यांच्यासह इतर खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली.

Arvind Kejriwal: ‘भाजपने पुन्हा एकदा पंजाबी जनतेचा…’; राघव चढ्ढांच्या सोडचिठ्ठीनंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, भाजपवर साधला निशाणा

Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासह इतर खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली. “भाजपने पुन्हा एकदा पंजाबी जनतेचा विश्वासघात केला आहे,” असा थेट आरोप करत केजरीवाल यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

केजरीवालांचा ‘X’वरून भाजपवर हल्लाबोल
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला. पंजाब आणि इतर राज्यांतील खासदारांनी पक्ष सोडण्याच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी म्हटले की, हा केवळ पक्षांतर नव्हे तर पंजाबच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे. भाजप सातत्याने ‘आप’ला कमकुवत करण्याचा आणि जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. या बंडामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात (राज्यसभेत) ‘आप’चे संख्याबळ घटल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

राज्यसभेत ‘आप’ला मोठे खिंडार; दोन-तृतीयांश सदस्य फुटले
गुरुवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत राघव चढ्ढा आणि संदीप पाठक यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. यावेळी चढ्ढा यांनी मोठा दावा केला की, ‘आप’च्या एकूण राज्यसभा खासदारांपैकी जवळपास दोन-तृतीयांश खासदारांनी पक्ष सोडला असून ते एका स्वतंत्र गटाच्या स्वरूपात भाजपमध्ये सामील होत आहेत. यामध्ये स्वाती मालीवाल आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश असल्याचे सांगत त्यांनी केजरीवालांच्या अडचणीत भर घातली आहे.

हेही वाचा – Raghav Chadha : ‘आप’मध्ये मोठं बंड! राघव चढ्ढा यांच्यासह 3 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश; आणखी 4 खासदार भाजपच्या वाटेवर

10 पैकी 7 खासदारांनी सोडली साथ; ‘आप’ संकटात
राघव चढ्ढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाच्या 10 राज्यसभा खासदारांपैकी तब्बल 7 खासदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामुळे ‘आप’मधील अंतर्गत संकट आता अधिकच गडद झाले असून पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एका बाजूला खासदारांचे पलायन आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीवर भाजपशी थेट संघर्ष, अशा दुहेरी पेचात सध्या अरविंद केजरीवाल अडकले आहेत. आगामी काळात या राजकीय भूकंपाचे पडसाद दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये उमटण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number