Grammys Awards 2026: दलाई लामा यांना 90 व्या वर्षी मिळाला ग्रॅमी पुरस्कार; किती आहे या बौद्ध धर्मगुरूंची संपत्ती? वाचा

वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिला ग्रॅमी पुरस्कार पटकावला असून, आध्यात्मिक विश्वातून संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मिळवणारे ते एक दुर्मिळ व्यक्तिमत्व ठरले आहेत.

Grammys Awards 2026: दलाई लामा यांना 90 व्या वर्षी मिळाला ग्रॅमी पुरस्कार; किती आहे या बौद्ध धर्मगुरूंची संपत्ती? वाचा

Dalai Lama Grammy Award:  तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी 68 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिला ग्रॅमी पुरस्कार पटकावला असून, आध्यात्मिक विश्वातून संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मिळवणारे ते एक दुर्मिळ व्यक्तिमत्व ठरले आहेत. त्यांच्या या यशानंतर जागतिक स्तरावर त्यांचे कौतुक होत असून, त्यांच्या संपत्तीबाबतही नेटकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

'ध्यान' अल्बमसाठी मिळाला सन्मान
दलाई लामा यांना त्यांच्या "ध्यान: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा" (Meditation: The Reflections of His Holiness the Dalai Lama) या अल्बमसाठी 'सर्वोत्कृष्ट ऑडिओबुक, कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंग' या श्रेणीत गौरविण्यात आले. या अल्बममधील त्यांचे प्रभावी कथन आणि शांततापूर्ण विचारांनी परीक्षकांसह प्रेक्षकांची मने जिंकली. या पुरस्कारामुळे दलाई लामा पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा विषय ठरले आहेत.

किती आहे दलाई लामांची संपत्ती?
दलाई लामा यांचे जीवन अत्यंत साधे आणि आध्यात्मिक मानले जाते, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती आश्चर्यकारक आहे. एका अंदाजानुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 150 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1250 कोटी रुपयांहून अधिक) इतकी आहे. निर्वासित जीवन जगणाऱ्या एका आध्यात्मिक नेत्याकडे इतकी मोठी संपत्ती असणे अनेकांसाठी अचंबित करणारे आहे.

हेही वाचा – Iran America War: इराण-अमेरिका युद्धाचा भडका उडणार? खामेनींचा ट्रम्प यांना थेट इशारा, म्हणाले 'कुणी त्रास दिला तर त्याला…'

उत्पन्नाचे मुख्य स्रोत
दलाई लामा यांच्या संपत्तीत भर टाकणारे अनेक मार्ग आहेत. जगभरातील अनुयायांकडून मिळणाऱ्या देणग्या हा त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची जगभरात होणारी विक्री, त्यांची सार्वजनिक भाषणे आणि त्यांच्या प्रतिमा किंवा नावाचा जाहिराती किंवा चित्रपटांमध्ये वापर केल्यास मिळणारी रॉयल्टी यातून ही मोठी रक्कम उभी राहते. साधे राहणीमान असूनही त्यांच्या कामाचा विस्तार आणि जागतिक प्रसिद्धी यामुळे त्यांच्या संपत्तीचा आकडा मोठा आहे.

ग्रॅमी 2026 मधील इतर प्रमुख विजेते
यावर्षीच्या ग्रॅमी पुरस्कारांवर लेडी गागा आणि केंड्रिक लामर यांनीही आपली मोहोर उमटवली. 'अब्राकाडाब्रा'साठी लेडी गागाला वर्षातील सर्वोत्तम गाण्याचा पुरस्कार मिळाला, तर केंड्रिक लामरच्या 'जीएनएक्स'ने सर्वोत्तम रॅप अल्बमचा मान मिळवला. तसेच, 'के-पॉप'नेही या सोहळ्यात आपले पहिले यश नोंदवून इतिहास घडवला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number