Sunday, July 13, 2025 11:02:11 PM

AMBANI ON PLANE CRASH: विमान अपघाताचा संपूर्ण रिलायन्स कुटुंबाला दुःख

अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत असताना एअर इंडियाचे बोईंग विमान कोसळले. यावर, मुकेश अंबानी यांनी त्यांच्या 'रिलायन्स फाउंडेशन' या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली.

ambani on plane crash विमान अपघाताचा संपूर्ण रिलायन्स कुटुंबाला दुःख

मुंबई: गुरुवारी दुपारी अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत असताना एअर इंडियाचे बोईंग विमान कोसळले. या एअर इंडियाच्या विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटन नागरिक, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. उड्डाणानंतर 1 मिनिटापेक्षा कमी वेळातच विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले आणि यामध्ये केवळ एकाचा जीव वाचू शकलेला आहे. एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांनी शोक व्यक्त केला आहे. 

हेही वाचा: AHMEDABAD PLANE CRASH: विमान अपघातातून अकोल्याची ऐश्वर्या थोडक्यात बचावली

काय म्हणाले मुकेश अंबानी?

शुक्रवारी, मुकेश अंबानी यांनी त्यांच्या 'रिलायन्स फाउंडेशन' या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, 'अहमदाबादमध्ये झालेल्या दुःखद विमान अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे नीता आणि मी आणि संपूर्ण रिलायन्स कुटुंबाला खूप दुःख झाले आहे. या दुःखद घटनेत बाधित झालेल्या सर्वांबद्दल आम्ही मनापासून आणि मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखद घटनेत, रिलायन्स चालू मदत कार्यांना पूर्ण आणि अटळ पाठिंबा देत आहे आणि शक्य तितक्या सर्व प्रकारे मदत करण्यास तयार आहे. प्रभावित झालेल्या सर्वांना त्यांच्या अकल्पनीय नुकसानातून सावरण्यासाठी शक्ती आणि सांत्वन मिळावे अशी आम्ही प्रार्थना करतो. ओम शांती'. 


सम्बन्धित सामग्री