Indian Army Social Media Policy : भारतीय जवानांसाठी नवीन सोशल मिडीया नियम लागू, आता इन्स्टाग्राम वापरताना…

शत्रू देशांकडून होणारे 'हनी ट्रॅप'चे प्रयत्न आणि डेटा चोरी रोखण्यासाठी लष्कराने इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि लिंक्डइन यांसारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सच्या वापरावर कडक निर्बंध लादले आहेत.<br/>

Indian Army Social Media Policy :  भारतीय जवानांसाठी नवीन सोशल मिडीया नियम लागू, आता इन्स्टाग्राम वापरताना…

Indian Army Social Media Policy : देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय लष्कराने आपल्या सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराचे नवीन धोरण लागू केले आहे. शत्रू देशांकडून होणारे 'हनी ट्रॅप'चे प्रयत्न आणि डेटा चोरी रोखण्यासाठी लष्कराने इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि लिंक्डइन यांसारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सच्या वापरावर कडक निर्बंध लादले आहेत.

काय आहेत नवीन नियमावली?

इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर फक्त 'वॉचिंग', 'नो पोस्टिंग': 

लष्कराच्या नवीन धोरणानुसार, लष्करी कर्मचारी इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर), यूट्यूब आणि क्वोरा यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर केवळ माहिती घेण्यासाठी किंवा देखरेख करण्यासाठी करू शकतील. या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही विषयावर मत मांडणे, कमेंट करणे किंवा स्वतःचे वैयक्तिक फोटो-व्हिडिओ अपलोड करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप वापरताना मोठी जबाबदारी: 

व्हॉट्सअॅप, टेलिग्राम किंवा सिग्नल यांसारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर केवळ सामान्य स्वरूपाच्या माहितीसाठी करता येईल. विशेष म्हणजे, सैनिक केवळ अशाच लोकांशी संवाद साधू शकतात ज्यांना ते वैयक्तिकरित्या ओळखतात. समोरच्या व्यक्तीची ओळख पटवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लष्करी कर्मचाऱ्याची असेल.

लिंक्डइनचा वापर केवळ नोकरीसाठी: 

व्यावसायिक नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या 'लिंक्डइन'चा वापर सैनिक केवळ त्यांचा बायोडाटा (Resume) अपलोड करण्यासाठी किंवा भविष्यातील नोकरीच्या संधी शोधण्यासाठी करू शकतात. तिथेही लष्करी माहिती शेअर करण्यास मज्जाव आहे.

हेही वाचा – UIDAI Safety Tips : सावधान! तुमचे आधार कार्ड रिकामे करू शकते बँक खाते; फसवणूक टाळण्यासाठी UIDAI ने दिल्या 'या' 5 महत्त्वपूर्ण टिप्स

शत्रूच्या 'हनी ट्रॅप'ला चाप लावण्याचा प्रयत्न

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांच्या गुप्तचर संस्था सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय सैनिकांना जाळ्यात ओढण्याचा (Honey Trap) प्रयत्न करतात. तसेच, फोटोंमधील लोकेशन किंवा पार्श्वभूमीवरून संवेदनशील माहिती शत्रूच्या हाती लागण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी लष्कराने हे कठोर पाऊल उचलले आहे.

हेही वाचा – Video: "हमासच्या नेत्याशी हस्तांदोलन केलं आणि काही तासांतच…" नितीन गडकरींनी सांगितला इस्माईल हनियेच्या हत्येपूर्वीचा थरार

नियम मोडल्यास कडक कारवाई

लष्कराने स्पष्ट केले आहे की, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच, क्लाउड स्टोरेज सेवा वापरताना जवानांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number