Saturday, May 17, 2025 09:25:44 PM

Pahalgam Attack: वेचून वेचून ठेचून काढणार

भारतात अतिरेकी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम केवळ काश्मिरात नाही तर संपूर्ण देशभरात राबवली जात आहे.

 pahalgam attack वेचून वेचून ठेचून काढणार

मुंबई : भारतात अतिरेकी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम केवळ काश्मिरात नाही तर संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. त्यासाठी वेगाने ठिकठिकाणी पाकिस्तानी नागरिक शोधून त्यांना वेळेत परत पाठवले जाणार आहे. मात्र, त्याच्या पलीकडे  देशांतर्गत घरभेद्यांना सुतासारखे सरळ करण्याचे  आव्हान भारतासमोर आहे. आश्चर्यकारकरित्या देशात अनेक ठिकाणी पाकिस्तानविरोधी आंदोलनांना भारतीय मुसलमानांचा विरोध होताना दिसून येत आहे. त्यापैकी कुणालाच माफ करायचे नाही अशी थेट भूमिका आता केंद्र सरकारने घेतलेली दिसत आहे. 
हेही वाचा : 'शेती महामंडळाच्या 22 हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे मिळणार

पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला तेव्हाच पहिली शंका आली होती की या हल्ल्यामागे स्थानिकांचे समर्थन आहे. भारतीय यंत्रणांनी पाकड्यांच्या हल्ल्याला कुणाचे समर्थन आहे ते शोधून काढले. असिफ शेख आणि आदिल ठाकोर या दोन अतिरेक्यांना शोधून काढले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यानंतर या दहशतवाद्यांचे फोटो आले. देहूरोडमधील रहिवासी असलेले श्रीजीत रमेशन हे देखील त्याचवेळी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. पहलगामपासून साडेसात किलोमीटरवर असलेल्या बेताब व्हॅली याठिकाणी श्रीजीत आणि त्यांचे कुटुंबीय गेले होते. मात्र बेताब व्हॅली याठिकाणी गेल्यानंतर श्रीजीत मुलीचं रिल्स काढत होते. हे रिल्स काढणं सुरू असतानाच संशयित दोन दहशतवादी या मुलीच्या पाठीमागून जात असल्यानं कैद झालं आहेत. श्रीजित रमेशन यांनी याबाबतची माहिती एनआयएला (NIA) दिली असून या व्हिडिओ आणि फोटोची संपूर्ण तपासणी ही एनआयएकडून केली जात आहे. 

उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. कुपवाडा याठिकाणी असलेला दहशतवाद्यांचा एक अड्डा सुरक्षा यंत्रणांनी उद्धवस्त केला आहे. येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अनंतनागमध्ये दहशतवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत. लष्कर आणि सीआरपीएफ संयुक्तरित्या या कारवाया करत आहे. यातून आत्तार्यंत 175 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. काश्मिरात होणाऱ्या कारवायांमुळे स्थानिकांनी जमिनी खालच्या तळघरांची साफसफाई सुरु केली आहे. दरम्यान भारतासमोर आव्हान आहे ते घरभेद्यांचे. कारण, लष्कराच्या संयुक्त कारवाईत सातत्याने स्थानिक काश्मिरी जनतेचा अतिरेक्यांना पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. कुलगाममध्ये 2 अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही ठोकेरपोरा, कायमोह येथील रहिवासी आहेत. झडतीनंतर त्यांच्या ताब्यातून 2 पिस्तूल, 25 पिस्तूल राउंडसह इतर शस्त्रं जप्त करण्यात आली.


सम्बन्धित सामग्री