New Toll Policy: संपूर्ण देशात एकही टोलनाका दिसणार नाही. आता देशभरातील टोल प्लाझा हटवले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यासाठी लवकरच नवीन टोल धोरण जाहीर केले जाईल, असंही ते म्हणाले. यावेळी नितीन गडकरी यांनी देशभरातील टोल प्लाझा हटवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि केंद्र सरकार लवकरच नवीन टोल धोरण आणणार असल्याचे सांगितले. तथापि, त्यांनी याबद्दल अधिक माहिती दिली नाही. ते म्हणाले, 'मी आत्ताच याबद्दल जास्त काही सांगणार नाही, पण येत्या 15 दिवसांत एक नवीन धोरण जाहीर केले जाईल. हे धोरण लागू झाल्यानंतर टोलबद्दल कोणालाही तक्रार करण्याचे कारण राहणार नाही, असंही यावेळी नितीन गडकरी यांनी नमूद केलं.
हेही वाचा - रस्ते सुरक्षेबाबत गडकरींची मोठी घोषणा! आता दुचाकींसोबत दोन ISI हेल्मेट देणे बंधनकारक
मुंबई-गोवा महामार्गाचे काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणार -
मुंबई-गोवा महामार्गाबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, त्याचे काम जून 2025 पर्यंत पूर्ण होईल. यामुळे वर्षानुवर्षे खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांना आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तथापी, देशाच्या पायाभूत सुविधांवर विश्वास व्यक्त करताना नितीन गडकरी म्हणाले, पुढील दोन वर्षांत भारतातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेपेक्षा चांगली असेल.
हेही वाचा - फक्त दोन वर्षे..! भारतातील रस्त्यांचे जाळे अमेरिकेइतके नव्हे तर त्याहून अधिक चांगले असेल; नितीन गडकरी यांचा मोठा दावा
दरम्यान, यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात येणाऱ्या आव्हानांची कबुली दिली. यांसदर्भात बोलताना ते म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाबाबत अनेक अडचणी होत्या पण काळजी करण्यासारखे काही नाही, आम्ही या जूनपर्यंत महामार्गाचे 100 टक्के काम पूर्ण करू.
महामार्गासाठी भूसंपादन विलंबित -
कायदेशीर वाद आणि अंतर्गत संघर्षांमुळे महामार्गासाठी भूसंपादन विलंबित झाल्याचेही यावेळी गडकरी यांनी सांगितले. न्यायालयात खटले सुरू होते आणि जमिनीचा मोबदला देण्यात अनेक अडचणी येत होत्या. पण आता ते सर्व प्रश्न सुटले आहेत आणि मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे, असंही नितीन गडकरी यांनी यावेळी नमूद केलं.