वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतासोबत मोठा व्यापार करार (Trade Agreement) झाल्याचा दावा करत, तो अमेरिकेच्या ऊर्जा निर्यातीसाठी (Energy Exports) ऐतिहासिक टप्पा ठरणार असल्याचे म्हटले. “Champion of Coal” या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अमेरिकन कोळशाच्या (US Coal) जागतिक विस्ताराचा उल्लेख करत भारता सोबतच्या कराराला विशेष महत्त्व दिले.
ट्रम्प म्हणाले की, अमेरिका सध्या जगातील क्रमांक एक ऊर्जा उत्पादक (Number One Energy Producer) बनली आहे आणि वेगाने मोठा ऊर्जा निर्यातदार (Massive Energy Exporter) म्हणून उदयास येत आहे. “गेल्या काही महिन्यांत आम्ही जपान, कोरिया, भारत आणि इतर देशांसोबत ऐतिहासिक व्यापार करार (Historic Trade Deals) केले आहेत. यामुळे अमेरिकन कोळशाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढेल. आमच्या कोळशाची गुणवत्ता जगात सर्वोत्तम मानली जाते,” असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा: Bangladesh Violence: बांग्लादेशामध्ये रक्ताची होळी; निवडणुकांच्या आदल्या दिवशी हिंदू तरुणाला निर्घृणपणे संपवलं; हात-पाय बांधलेला मृतदेह सापडल्याने खळबळ
भारतासोबतचा करार हा अमेरिकन कोळशाला उच्च दर्जा म्हणून जागतिक बाजारपेठेत (Global Energy Market) स्थान मिळवून देण्याच्या व्यापक धोरणाचा भाग असल्याचे ट्रम्प यांनी संकेत दिले. ऊर्जा क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेता, अमेरिका त्यांची निर्यात क्षमता (Export Capacity) बळकट करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, ट्रम्प यांनी जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यासोबत झालेल्या अलीकडील करारांचाही उल्लेख केला. या देशांसोबतही कोळशाच्या पुरवठ्यात वाढ करण्यासाठी करार अंतिम करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. अमेरिकेच्या ऊर्जा सामर्थ्याचा (Energy Strength) विस्तार हा त्यांच्या प्रशासनाच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे भारत-अमेरिका ऊर्जा सहकार्य (India US Energy Cooperation) नव्या टप्प्यात प्रवेश करणार का, याकडे आता जागतिक बाजाराचे लक्ष लागले आहे. कोळशाच्या वाढत्या निर्यातीमुळे जागतिक ऊर्जा संतुलनावर (Global Energy Balance) काय परिणाम होणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा: Stamp Scam: तेलगी प्रकरणाची पुनरावृत्ती? मुंबई पोलिसांकडून बनावट पोस्टल स्टॅम्प रॅकेटचा पर्दाफाश; पाच राज्यांत पसरलेली पाळेमुळे खोदून काढली