Wednesday, November 19, 2025 02:15:14 PM

Jaisalmer Bus Fire: जैसलमेरमध्ये दुर्दैवी अपघात! चालत्या बसला लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी

आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच जवळील लष्करी जवानांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

jaisalmer bus fire जैसलमेरमध्ये दुर्दैवी अपघात चालत्या बसला लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू 40 हून अधिक जखमी

Jaisalmer Bus Fire: राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. थैयत परिसरात लष्करी तळाजवळून जात असताना एका खाजगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागली. या दुर्घटनेत किमान 15 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 40 प्रवासी जखमी झाले आहेत. बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अचानक धुराचे लोट येताना पाहिले. काही क्षणातच आग भडकली आणि चालकाने तत्काळ वाहन थांबवले. मात्र, काही प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर घडल्याने अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागून मोठी वाहतूक कोंडी झाली.

हेही वाचा - Bihar BJP Candidate List 2025: भाजपकडून बिहार निवडणुकीसाठी 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 7 वेळा आमदार राहिलेले नंद किशोर यादव यांचे तिकीट रद्द

आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच जवळील लष्करी जवानांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. जखमींना जवळच्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - Google To Build AI Hub in India: गुगल भारतात AI हब उभारणार; सुंदर पिचाई यांची मोठी घोषणा

दरम्यान, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.


सम्बन्धित सामग्री