नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज देशाचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला. या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत आज टॅक्ससंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर लागणार नाही. अर्थसंकल्पातील या घोषणेमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी करदात्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी ही मोठी बातमी आहे. केवळ पगारदार लोकांना 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार आहे. त्यामुळे पगारदारांना दिलासा मिळाला आहे. पगाराव्यतिरिक्त 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांसाठी करमुक्त नाही.
हेही वाचा : गोंदियात दुर्मिळ शस्त्रक्रिया, महिलेच्या पोटातून काढला 1.67 किलोचा किडनी स्टोन
2025 मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पातून केवळ पगारदारांचे 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. यामुळे कर भरता आला नाही त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 70 हजारांची सूट देण्यात आली आहे. तर 25 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 लाख वीस हजारांची सूट देण्यात आली आहे.
हेही वाचा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार अर्थसंकल्प
नवी कररचना
नवीन करप्रणालीनुसार 0 ते 4 लाख रूपयांपर्यंतच्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही. 4 ते 8 लाखांपर्यंतच्या रकमेवर पाच टक्के कर आकारला जाणार आहे. 8 ते 12 लाख रूपयांपर्यंतच्या रकमेवर 10 टक्के कर आकारला जाणार आहे. 12 ते 16 लाखांपर्यंतच्या रकमेवर 15 टक्के कर आकारला जाणार आहे. 16 ते 20 लाखांपर्यंतच्या रकमेवर 20 टक्के कर आकारला जाईल. 20 ते 24 लाख रूपयांपर्यंतच्या रकमेवर 25 टक्के कर आकारला जाणार आहे. तर 24 लाखांवर असणाऱ्या रकमेवर 30 टक्के कर आकारला जाणार आहे.