Wednesday, May 14, 2025 11:01:00 PM

Unprovoked Firing: काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाक लष्कराचा गोळीबार

काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी लष्कराच्या सैन्यांकडून विनाकारण गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.

unprovoked firing काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाक लष्कराचा गोळीबार

नवी दिल्ली : काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी लष्कराच्या सैन्यांकडून विनाकारण गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. रात्रभर पाक लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. या चकमकीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गुरुवारी रात्री काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या विविध चौक्यांकडून विनाकारण गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. भारतीय सैन्याने शस्त्रांनी योग्य प्रत्युत्तर दिले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा : 232 प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; काश्मिरातून आतापर्यंत 800 पर्यटक परतले

बंदिपोरा येथे लष्कर ए तालिबासंबंधित एक दहशतवादी सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत ठार झाला आहे. अलताफ लल्ली असं त्याचं नाव असून त्याने लष्कर ए तालिबान कपडे परिधान केले होते. तसंच अजस जिल्ह्यातील कुलनार येथे झालेल्या चकमकीत  भारताचे दोन जवान जखमी झाले आहेत. या जवानांना जवळच्या रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकांनी तिथे शोध मोहिम राबवली होती. त्यानंतर येथे चकमक झाली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भारतीय लष्कर हायअलर्टवर आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध ठिकाणी शोधमोहिम सुरु केली आहे. लष्करप्रमुक उपेंद्र द्विवेदी उत्तरेकडील मुख्यालय येथील सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी उधमपूर येथे आले होते. 

दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन 
पहलगाममधील अलिकडे झालेल्या हल्ल्यांनंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहिम राबवली. या हल्ल्यात पाच ते सहा दहशतवादी होते. दरम्यान अधिकाऱ्यांनी हल्ल्यातील संशयित तीन जणांचे फोटो जारी केले आहेत. त्यांच्या ठिकाणाची माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे बक्षीस जम्मू काश्मीर सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. 

 


सम्बन्धित सामग्री