UPI Transactions: भारत आता खऱ्या अर्थाने डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे दररोज सरासरी 94,000 कोटींचे व्यवहार झाले. UPI व्यवहारात सप्टेंबरच्या तुलनेत तब्बल 13 टक्क्यांची वाढ झाली आहे.
दिवाळी हंगामात UPIचा धमाका
विशेष म्हणजे, ऑक्टोबरमध्ये UPI द्वारे झालेल्या एकूण व्यवहारांचे मूल्य अनेक वेळा 1 लाख कोटींच्या वर गेले. हे भारतातील डिजिटल व्यवहार संस्कृतीचा नवा उच्चांक ठरला आहे. उत्सवांच्या खरेदी, बोनस, ऑफर्स आणि ऑनलाइन सवलतींमुळे UPI वापर झपाट्याने वाढला. दिवाळीच्या आधीच UPI ने एका दिवसात 740 दशलक्ष व्यवहारांचा विक्रम प्रस्थापित केला.
हेही वाचा - WhatsApp हॅक झालंय? त्वरित करा हे 5 महत्त्वाचे उपाय, अन्यथा सगळंच येऊ शकतं धोक्यात!
दरम्यान, ऑक्टोबरमध्ये सरासरी दररोज 695 दशलक्ष व्यवहार झाले. हे सप्टेंबरच्या तुलनेत सुमारे 6 टक्के वाढ दर्शवते. तज्ज्ञांच्या मते, GST दरातील अलीकडील कपात, बोनस सीझन आणि मोबाईल इंटरनेटची उपलब्धता यामुळे UPI व्यवहार वाढले आहेत. आज जवळपास प्रत्येक छोट्या दुकानदाराकडे QR कोड आहे, ज्यामुळे डिजिटल पेमेंट सामान्य लोकांसाठीही सोपे झाले आहे.
हेही वाचा - 8th Pay Commission: केंद्र कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अधिसूचनेसंदर्भात मोठे अपडेट
तथापी, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर ही गती कायम राहिली, तर ऑक्टोबर अखेरपर्यंत UPI चे एकूण व्यवहार मूल्य 28 लाख कोटींचा टप्पा ओलांडेल, जो आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम ठरेल.