Viral Video : पालकांनो लक्ष द्या! ई-रिक्षामध्ये काही शाळकरी मुलांसोबत…; VIDEO पाहताच उडाला थरकाप

Shocking Viral Video : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधून एक धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओ नुकताच समोर आलेला आहे. एका छोट्या ई-रिक्षामध्ये काही शाळकरी मुलांसोबत प्रकार घडलेला आहे.
मुजफ्फरनगरमध्ये धक्कादायक प्रकार
मुजफ्फरनगरमध्ये ई-रिक्षा चालकाचा हलगर्जीपणा उघड

Viral Video : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधून एक धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओ नुकताच समोर आलेला आहे. एका छोट्या ई-रिक्षामध्ये काही शाळकरी मुलांसोबत प्रकार घडलेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अगदी चिमुकली मुलं ही मुठभर जागेत एकमेंकावर बसले आहेत. हा प्रकार गुरुवारी दुपारी साधारण 12 वाजता शाळा सुटल्यानंतरचा आहे, तर हा व्हिडिओ शुक्रवारी सकाळी 7 वाजता व्हायरल झालेला आहे.

घडलं काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, ई-रिक्षाच्या आतमध्ये तब्बल 14 मुलं ही खचाखच भरलेली आहेत. बसायला जागा नसल्याने मुलं ही एकमेंकाच्या अंगावरही हसली आहेत. तर धक्कादायक गोष्ट म्हणजे चालकाच्या सीटवरही पुढे 6 मुलांना पुढे-मागे करुन बसवण्यात आलेले आहे. एवढंच नाही तर 4 मुलं ही रिक्षाच्या मागच्या बाजूला पाय बाहेर आणि जीव धोक्यात घालून लटकत बसलेली दिसून येत आहेत.

हेही वाचा-Chhatrapati Sambhajinagar Crime : फॉर्म भरण्यासाठी घराबाहेर पडली आणि थेट पुलावर….; तरुणीने केलेल्या कृत्याने सर्वच हादरले

शाळेची रिक्षा की खासगी वाहन?
हा सर्व प्रकार पाहून तिथे असलेल्या एका जागरुक नागरिकाने या ई-रिक्षा चालकाला जाब विचारला आणि संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ तो व्यक्ती ई-रिक्षा चालकाला विचारत आहे की, ”तू रोज अशीच मुलं कोंबून नेतोस का”, तुझं नाव काय आहे”. या व्हिडिओनंतर मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत शिक्षणासाठी पाठवत असतात, पण अशा जीवघेण्या वाहतुकीमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. संबंधित रिक्षा ही शाळेती अधिकृत वाहतूक व्यवस्था आहे की एखादा खासगी चालक पैसे कमावण्यासाठी मुलांचे जीव धोक्यात घालत आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version