17 वर्षीय मुलाची लिंगबदलाची इच्छा; विरोध होताच आईसोबतचं केलं भयंकर कृत्य

Son Killed Mother : एका आईला आपल्याच 17 वर्षीय मुलाला लिंगबदलाची इच्छा असल्याचं समजलं, तेव्हा तिच्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. मुलाच्या या निर्णयाला आईने विरोध केला. मात्र, त्यानंतर जे घडलं ते अतिशय धक्कादायक होतं.
Teen Allegedly Kills Mother Over Gender Transition Dispute
17 वर्षीय मुलाची धक्कादायक इच्छा

आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं,सुखी आयुष्य जगावं आणि पुढे आवडीनुसार संसार थाटावा, अशी प्रत्येक आई-वडिलांची साधी इच्छा असते. मात्र, जेव्हा एका आईला आपल्याच 17 वर्षीय मुलाला लिंगबदलाची इच्छा असल्याचं समजलं, तेव्हा तिच्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. मुलाच्या या निर्णयाला आईने विरोध केला. मात्र, त्यानंतर या 17 वर्षीय मुलाने आईसोबतच जे टोकाचं पाऊल उचललं, त्याने संपू्र्ण कुटुंबाला हादरवून टाकलं आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात.

आईने विरोध करताच घडलं भयंकर
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमधील राजेंद्र नगर परिसरात संपूर्ण धक्कादायक घटना घडली असून 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबासह याच परिसरात वास्तव्यास आहे. मुलाला लिंगबदलाची शस्त्रक्रिया करुन घ्यायची होती. या गोष्टीवरुन आरोपी मुलगा आणि त्याच्या कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासूनच वाद होते.

हेही वाचा-हृदयद्रावक! 7 वर्षीय मुलाचा खोडकरपणा अन् पत्नीने…; अखेर वडिलांनी घरातचं संपवलं जीवन

घटनेदिवशी, 42 वर्षीय महिला अर्थात ही त्याला शस्त्रक्रिया न करण्याबाबत समजून सांगत होती. या शस्त्रक्रियेऐवजी चांगल्या डॉक्टरांकडे जात वैद्यकीय आणि मानसिक उपचार घेण्याचाही सल्ला देत होती. याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये वाद जोरदार वाढला. संतापलेल्या मुलाने आपल्याच आईच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला. याच हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, या घटनेनंतर अल्पवयीन मुलानेच आपल्याच गुन्ह्याची पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांसमोर उघड केलं सत्य
मुलाचा फोन येताच पोलिसांनी कोणताही वेळ वाया न घालवता घटनास्थळी धाव घेतली. त्यांना संबंधित अपार्टमेंटमध्ये महिलेचा मृतदेह हा आढळून आला, तर आरोपी अल्पवयीन मुलगा हा घटनास्थळीत उपस्थित होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु केली आहे. घटनास्थळावरुन काही पुरावे गोळ करण्यात आले आहेत आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ही पाठवला आहे. सध्या या प्रकरणाता पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version