Road Accident: DJ घेऊन जाणारी पिकअप गाडी अन् ट्रकची जोरदार धडक; 6 जणांचा मृत्यू, 7 जखमी

या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Road Accident: DJ घेऊन जाणारी पिकअप गाडी अन् ट्रकची जोरदार धडक; 6 जणांचा मृत्यू, 7 जखमी
पिकअप आणि ट्रकची धडक, 6 जणांचा करुण अंत

Road Accident: छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-30 वर शुक्रवारी एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघाताची पार्श्वभूमी आणि भीषणता

प्राप्त माहितीनुसार, धमतरी आणि कांकेर दरम्यान असलेल्या ‘मरकाटोला घाट’ येथे हा अपघात झाला. डीजे (DJ) यंत्रणा वाहून नेणारी एक पिकअप गाडी आणि भात (धान) भरलेला एक भरधाव ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, पिकअप गाडीचा आणि त्यावरील डीजे यंत्रणेचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

पोलिसांकडून मदतकार्य सुरू

हा अपघात बालोद जिल्ह्यातील पुरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मदत आणि बचावकार्य राबवून सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवरना यांनी या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या आणि 7 जण जखमी झाल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number