मुंबई : महाराष्ट्रात एचएमपीव्हीचा शिरकाव झाला आहे. नागपुरात एचएमपीव्ही व्हायरसचे 2 रुग्ण सापडले. त्या दोन मुलांची चाचणी केल्यावर 2 लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आला. यामध्ये 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला लागण एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाली आहे. त्या दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापाची लक्षणे आढळून आली. दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती समोर आली.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
एचएमपीव्हीचा धोका लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांमध्ये जाणवत आहे. त्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रौढांमध्ये एचएमपीव्हीची लक्षणे काय आहेत?
- घसा खवखवणे
- खोकला
- अनुनासिक रक्तसंचय
- कमी दर्जाचा ताप
- थकवा
लहान मुलांमध्ये एचएमपीव्हीची लक्षणे काय आहेत?
- ताप
- अनुनासिक रक्तसंचय
- वाहणारे नाक
- खोकला
- घशात घरघर होणे
- श्वास घेण्यात अडचण
- जलद
- श्वासोच्छ्वास
- छाती मागे घेणे
हेही वाचा : HMPV : कोरोना आणि एचएमपीव्हीमध्ये फरक काय? जाणून घ्या एचएमपीव्हीविषयी महत्त्वाची माहिती...
एचएमपीव्ही रोखण्यासाठी ही काळजी घ्यावी
- खोकला किंवा शिंका येत असल्यास तोंड व नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे.
- साबण, पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवावे.
- ताप खोकला आणि शिंक येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा
- भरपूर पाणी प्यायला हवे.
- पौष्टिक अन्न खा.
- संक्रमण कमी करण्यासाठी पुरेशी हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.