Starlink Satellite Internet: एलोन मस्कची सॅटेलाइट इंटरनेट सेवा Starlink आता भारतात प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे. सरकारी मान्यतेच्या अंतिम टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, कंपनी जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये आपली सेवा सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांसाठी ही सेवा इंटरनेट जगतातील गेम चेंजर ठरू शकते.
स्टारलिंक इंटरनेट लाँचची तारीख
स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या जवळजवळ सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. सध्या कंपनी SATCOM मान्यता आणि स्पेक्ट्रम वाटपाच्या प्रतीक्षेत आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रक्रिया 2025 च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 2026 च्या जानेवारी-फेब्रुवारीत Starlink इंटरनेट अधिकृतपणे सुरू होईल.
हेही वाचा - ISRO : नौदलाची ताकद वाढणार! 'CMS-03' उपग्रह इस्रो 'या' दिवशी करणार प्रक्षेपित; चीनच्या आव्हानाला दणदणीत उत्तर
20 लाख कनेक्शनपर्यंत मर्यादा
भारत सरकारने Starlink ला सुरुवातीला 20 लाख ग्राहकांपर्यंतच सेवा देण्याची परवानगी दिली आहे. कंपनी ग्रामीण आणि दुर्गम प्रदेशांवर लक्ष केंद्रित करणार आहे, जिथे पारंपरिक ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ग्रामीण भारतात डिजिटल कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय सुरू होईल.
सेटअप आणि मासिक खर्च किती असेल?
स्टारलिंक सेवेसाठी वापरकर्त्यांना एकदा 30 हजारपर्यंत सेटअप शुल्क भरावे लागेल. यामध्ये उपकरणे आणि स्थापनेसाठी लागणारा खर्च समाविष्ट असेल. त्यानंतर मासिक सदस्यता शुल्क 3300 पासून सुरू होईल. ही किंमत पारंपरिक ब्रॉडबँडपेक्षा जास्त असली, तरी दुर्गम भागातील वापरकर्त्यांसाठी हा एकमेव हाय-स्पीड पर्याय ठरणार आहे.
हेही वाचा - UPI Transactions : आता युपीआय पेमेंट करणं अधिक सोपं! फिंगरप्रिंट आणि फेस आयडीच्या वापराने करा झटपट व्यवहार; जाणून घ्या स्टेप्स
इंटरनेटचा वेग आणि योजना
स्टारलिंककडून भारतात 25 Mbps ते 225 Mbps इतका इंटरनेट स्पीड मिळू शकतो. बेसिक प्लॅनमध्ये 25 Mbps तर प्रीमियम योजनांमध्ये 225 Mbps पर्यंतचा वेग दिला जाईल. शहरी भागांच्या तुलनेत हा वेग थोडा कमी वाटू शकतो, परंतु ग्रामीण भागातील इंटरनेट वापरासाठी तो क्रांतिकारक ठरेल, असा तज्ञांचा अंदाज आहे.