Anmol Bishnoi Custody : गँगस्टर अनमोल बिश्नोईचा ताबा कोणत्या एजन्सीला मिळणार?; गृह मंत्रालयाचा निर्णय आला समोर

भारतीय न्याय संहिता (BNSS) कलम 303 अंतर्गत पुढील एका वर्षासाठी कोणतेही राज्य पोलीस किंवा तपास यंत्रणा अनमोल बिश्नोईला ताब्यात घेऊ शकणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

Anmol Bishnoi Custody : गँगस्टर अनमोल बिश्नोईचा ताबा कोणत्या एजन्सीला मिळणार?; गृह मंत्रालयाचा निर्णय आला समोर

Anmol Bishnoi Case: कुख्यात गुंड अनमोल बिश्नोई याच्याबाबत गृह मंत्रालयाने एक महत्त्वाचा आणि सुरक्षेच्या दृष्टीने निर्णायक आदेश जारी केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNSS) कलम 303 अंतर्गत पुढील एका वर्षासाठी कोणतेही राज्य पोलीस किंवा तपास यंत्रणा अनमोल बिश्नोईला ताब्यात घेऊ शकणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार, कोणत्याही एजन्सीला चौकशी करायची असल्यास ती फक्त तिहार तुरुंगातच करता येणार आहे. सार्वजनिक सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच आरोपीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आल्याचे गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अनमोल बिश्नोईविषयी असलेली गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेटवर्क लक्षात घेता हा आदेश महत्त्वाचा मानला जात आहे.

कलम 303 म्हणजे काय?

BNSS च्या कलम 303 अंतर्गत गृह मंत्रालयाला कोणत्याही कैद्याच्या हालचालींवर निर्बंध घालण्याचा तसेच त्याला सध्याच्या तुरुंगातच ठेवण्याचे निर्देश देण्याचा अधिकार आहे. या तरतुदीचा उद्देश सार्वजनिक शांतता बिघडू नये, कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ नये आणि आरोपीला संभाव्य बाह्य धोक्यांपासून संरक्षण देणे हा आहे. यापूर्वी अनमोलचा भाऊ आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्याविरोधातही साबरमती तुरुंगात असताना असाच आदेश जारी करण्यात आला होता.

हेही वाचा – National Investigation Agency: तामिळनाडू ISIS कट्टरतावाद प्रकरणात NIA ची मोठी कारवाई; सात आरोपींसह एका संस्थेवर आरोपपत्र दाखल

एनआयए कोठडी आणि न्यायालयीन प्रक्रिया

अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर अनमोल बिश्नोईला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली होती. त्यानंतर त्याला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला 11 दिवसांची एनआयए कोठडी मंजूर केली होती. पुढे तपासासाठी ही कोठडी आणखी सात दिवसांनी वाढवण्यात आली. सध्या अनमोल बिश्नोई न्यायालयीन कोठडीत असून, शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची हजेरी घेण्यात आली.

अनमोल बिश्नोईवरील गंभीर आरोप

अनमोल बिश्नोईवर अनेक गंभीर आणि हाय-प्रोफाइल गुन्ह्यांचे आरोप आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत सहभाग, पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा कट तसेच अभिनेता सलमान खान यांच्या निवासस्थानी गोळीबार करण्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. तपासादरम्यान तो अमेरिकेत बसून टोळीच्या गुन्हेगारी कारवाया आणि रसद व्यवस्थापन करत असल्याचेही समोर आले आहे.

हेही वाचा – India Fuel Buyer: रशियन इंधन आयातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर; नोव्हेंबरमध्ये 3.3 अब्ज रुपयांची खरेदी

फरार ते अटक असा प्रवास

अनमोल बिश्नोई 2022 पासून फरार होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याप्रकरणी तेथील अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. भारतात दाखल होताच एनआयएने त्याला अटक केली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. अनमोलचा मोठा भाऊ लॉरेन्स बिश्नोई हा देखील कुख्यात गुंड असून तो सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे. लॉरेन्सविरोधातही गृह मंत्रालयाने कलम 303 अंतर्गत आदेश जारी करून त्याच्या हालचालींवर कडक निर्बंध घातले आहेत. दोन्ही भावांची प्रकरणे राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील मानली जात असून, तपास यंत्रणा त्यांच्या गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number