Wednesday, November 19, 2025 01:31:56 PM

Amit Shah: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार होणार का?, अमित शाहांचे स्पष्ट मत

बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विरोध आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा होत आहेत. मात्र बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न विचारला जात आहे.

amit shah बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार होणार का अमित शाहांचे स्पष्ट मत

पाटणा: बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विरोध आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा होत आहेत. मात्र बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न विचारला जात आहे.  जर बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन झालं तर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का? नितीश कुमार यांची तब्येत ठीक आहे का? 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या दोन्ही प्रमुख प्रश्नांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं. तसेच, बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याचे संकेतही दिले.

एका मुलाखतीत शाह यांनी बिहार निवडणुकीवर परखड भाष्य केलं. "हे संपूर्ण प्रकरण कुठून सुरू झाले? लालू प्रसाद यादव यांना त्यांचा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा आहे. सोनिया गांधींनाही त्यांचा मुलगा पंतप्रधान व्हावा अशी इच्छा आहे. मी आज दोघांनाही सांगू इच्छितो की बिहार आणि दिल्लीत कोणतीही जागा रिक्त नाही. नितीश बाबू इथं आहेत, मोदीजी तिथे आहेत. तुमच्या मुलांसाठी जागा नाही. आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत. एनडीए आघाडीत कोणताही गोंधळ नाही. पुन्हा विचारले असता, अमित शाह यांनी स्पष्ट केले, "मी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत." असं शाह यांनी स्पष्टपणे सांगितलं.

हेही वाचा: Rahul Gandhi: 'मतांसाठी मोदी नाचायलाही तयार होतील'; बिहारमध्ये राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

"उपमुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर अमित शाह म्हणाले की, जेव्हा या विषयावर चर्चा होईल तेव्हा निकाल लागल्यानंतर सर्वजण एकत्र बसून नाव ठरवतील. आपल्याकडे असे वाद नाहीत की एखाद्याला खूश करण्यासाठी शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्रिपदाची घोषणा करावी लागते. ज्या दिवशी घोषणा होईल, त्या दिवशी मोठी व्होट बँक नाराज होते. याबद्दल अनेक म्हणीही फिरू लागल्या आहेत. परंतु भाजप आणि एनडीए ज्या टीमची नियुक्ती करतील ती बिहारच्या विकासासाठी समर्पित असेल" असंही शाह यांनी सांगितलं.

अमित शाह म्हणाले, "मुख्यमंत्री दररोज चार जाहीर सभा घेत आहेत. ते सर्वांच्या मध्ये असतात. त्यांना तीन मजले चढून सार्वजनिक सभा घेण्यासाठी उतरावे लागते. त्यांना चार सभा घेण्यासाठी किमान अडीच ते तीन किलोमीटर चालावे लागते. अशा परिस्थितीत आरोग्याचा प्रश्न कुठे आहे? नितीशकुमार लालू आणि राबडी यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत आहेत." 


सम्बन्धित सामग्री