Thursday, November 13, 2025 07:02:06 AM

टेलरने वेळेवर ब्लाऊज न दिल्याने महिलेने घेतली न्यायालयात धाव; शिंप्याला ठोठावण्यात आला 11,500 रुपयांचा दंड

टेलरने वेळेत ब्लाउज तयार केला नाही आणि नंतरही डिलिव्हरी करण्यातही विलंब केला. अखेर लग्नाची तारीख उलटून गेली आणि महिलेला ब्लाउज न मिळाल्याने तिने ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली.

टेलरने वेळेवर ब्लाऊज न दिल्याने महिलेने घेतली न्यायालयात धाव शिंप्याला ठोठावण्यात आला 11500 रुपयांचा दंड

Ahmedabad Blouse Dispute: अहमदाबादमधील ग्राहक आयोगाने एका महिलेला न्याय मिळवून दिला आहे, ज्यांनी वेळेवर ब्लाउज न दिल्याबद्दल शिंप्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ही घटना नवरंगपुरा परिसरातील असून, तक्रारदार महिलेने सीजी रोडवरील एका शिंपी दुकानातून तिच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी खास ब्लाउज शिवण्यासाठी टाकला होता. त्यासाठी तिने 4295 रुपये आगाऊ दिले होते.

हेही वाचा - Rajasthan Shahbaz Horse: पुष्कर मेळ्यात 15 कोटींच्या ‘शाहबाज’ घोड्याने वेधलं लोकांचं लक्ष; काय आहेत याची वैशिष्ट्ये? जाणून घ्या

मात्र, टेलरने वेळेत ब्लाउज तयार केला नाही आणि नंतरही डिलिव्हरी करण्यातही विलंब केला. अखेर लग्नाची तारीख उलटून गेली आणि महिलेला ब्लाउज न मिळाल्याने तिने ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली. सुनावणीदरम्यान शिंपी आयोगासमोर उपस्थित राहिला नाही, त्यामुळे एकतर्फी निर्णय देण्यात आला. आयोगाने स्पष्ट म्हटले की, सेवा वेळेवर न पुरवल्यामुळे ग्राहकाला मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा - हो, हे खरंय! 'या' देशाच्या मंत्री एकाचवेळी देणार 83 बाळांना जन्म; कसं? वाचा सविस्तर

न्यायालयाच्या निर्णयानुसार, टेलरला आता 4,395 रुपये व्याजासह परत करावे लागतील. तसेच 2500 रुपये मानसिक त्रास आणि खटल्याचा खर्च म्हणून एकून 11500 रुपये भरावे लागतील. हा निर्णय ग्राहक अधिकारांसाठी एक महत्त्वाचा संदेश देतो की कोणतीही सेवा वेळेवर आणि गुणवत्तेनुसार न दिल्यास ग्राहक त्याविरुद्ध न्याय मिळवू शकतो.
 


सम्बन्धित सामग्री