नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटप्रेमी ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. महिला वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेल्या भारताचा प्रतिस्पर्धी कोण? हा प्रश्न मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय होता. आता मात्र चित्र स्पष्ट झाले आहे.
भारतीय संघाने न्यूझीलंडवर थरारक विजय मिळवत सेमीफायनलमध्ये दमदार प्रवेश केला. सहा सामन्यांच्या प्रवासात भारताने विजय-पराजयाच्या चढउतारांचा सामना केला. श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवून भारताने मोहीम उज्ज्वलरीत्या सुरू केली होती. परंतु त्यानंतर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध पराभव होताच भारतीय महिला क्रिकेट संघ निराशा झाला होता.
मात्र टीम इंडियाने हार न मानता पुन्हा जोरदार पुनरागमन केले. न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक सामन्यात भारताने विजय मिळवत गुणतालिकेत अत्यंत महत्वाचे गुण मिळवले आणि उपांत्य फेरीची तिकीट मिळवूनच दाखवले.
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला केवळ 97 धावांवर गुंडाळत अवघ्या सात गडी राखून विजय मिळवला. या धडाकेबाज विजायातून ऑस्ट्रेलिया पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी सरकला.
हेही वाचा: LIC-Adani Controversy: एलआयसीने दबावाखाली अदानीमध्ये गुंतवणूक केली का? कंपनीने दिलं स्पष्टीकरण
भारत चौथ्या स्थानावर असल्याने, सेमीफायनलचा सामना गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असलेल्या संघाशी होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. आणि तेच आता त्यावर शिक्कामोर्तब सुद्धा झालं आहे. सेमिफायनलचा हा सामना रंगेल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा!
भारतीय संघाला लीग सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे हा सामना टीम इंडियासाठी पराभवाचा बदला घेण्याची एक सुवर्णसंधी असेल. भारतीय चाहत्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे “यावेळी परिस्थिती बदलेल का? भारत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारेल का?”
आता या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मैदानावरच मिळणार आहेत. भारतीय फलंदाजांची फॉर्म, गोलंदाजांचा कमाल आत्मविश्वास आणि चाहत्यांचा अमाप पाठिंबा हे सर्व भारताच्या बाजूने आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया तुफान फॉर्मात आहे आणि वर्ल्ड कपमधील त्यांचा अनुभवही प्रचंड दांडगा आहे. त्यामुळे या दोन्ही संघात सेमीफायनलमध्ये होणार आहे अतिशय तगडी लढत!
हेही वाचा: GST नवीन प्रणालीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा