Donald Trump : आधी टॅरिफ लावून कोंडी केली, आता मोदींचे कौतुक; लवकरच भारत दौरा, काय असणार ट्रम्पची रणनीती?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं असून, पुढील वर्षी भारत दौऱ्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Donald Trump : आधी टॅरिफ लावून कोंडी केली, आता मोदींचे कौतुक; लवकरच भारत दौरा, काय असणार ट्रम्पची रणनीती?

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले असून, त्यांनी पुढील वर्षी भारताला भेट देण्याची शक्यता व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींसोबत त्यांचे संवाद “खूपच सकारात्मक आणि सुरळीत” सुरू आहेत. ट्रम्प यांनी म्हटले की, “पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत. आम्ही नियमित बोलतो आणि त्यांनी मला भारतात येण्यासाठी आमंत्रित केले आहे." त्यांनी हेही नमूद केले की, “मोदींनी रशियाकडून खरेदी मोठ्या प्रमाणात थांबवली आहे. ते एक महान व्यक्ती आहेत आणि मी त्यांचा सन्मान करतो.”

सध्या भारत-अमेरिका व्यापार चर्चा सुरू आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यातील संवाद त्या पार्श्वभूमीवर अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिकेने अलीकडेच रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 50% टॅरिफ, तसेच 25% अतिरिक्त शुल्क लागू केले होते. तरीही दोन्ही देशांतील आर्थिक आणि रणनीतिक संबंध सकारात्मक दिशेने वाढत आहेत. जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले की, “आपण पुढील वर्षी भारतात जाण्याचा विचार करत आहात का?”, त्यावर ट्रम्प म्हणाले, “हो हे कदाचित शक्य आहे."

हेही वाचा: Technical Glitch in ATC Server: दिल्ली विमानतळावर ATC सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड; 25 उड्डाणे टेकऑफसाठी प्रतीक्षेत

व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारत-अमेरिका संबंधांबाबत अत्यंत सकारात्मक आहेत आणि त्यांना या भागीदारीवर पूर्ण विश्वास आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “काही आठवड्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिवाळीच्या निमित्ताने ओव्हल ऑफिसमध्ये भारतीय-अमेरिकन अधिकाऱ्यांसह साजरा करताना पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधला. हा संवाद अतिशय आशादायी आणि फलदायी ठरला.”

रशियन तेल आयातीबाबत भारताची स्पष्ट भूमिका

ट्रम्प यांनी त्यांच्या आशिया दौऱ्यादरम्यान भारताच्या रशियन तेल खरेदीबाबत उल्लेख केला होता. त्यांनी म्हटले होते की, “भारत या बाबतीत चांगले काम करत आहे आणि पंतप्रधान मोदींनी रशियाकडून तेल आयात कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.” तथापि, भारताने आपल्या धोरणांबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जायसवाल यांनी सांगितले की, “भारत हा तेल आणि गॅसचा मोठा आयातदार देश आहे. आमचे ऊर्जास्रोत धोरण पूर्णपणे राष्ट्रीय हित आणि ग्राहकांच्या कल्याणावर आधारित आहे. जागतिक ऊर्जाबाजारातील अस्थिरतेत भारतीय ग्राहकांचे हित सुरक्षित ठेवणे ही आमची प्राधान्याची बाब आहे.

ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा दोन्ही देश व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवे सहकार्य मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. दोन्ही नेत्यांतील व्यक्तिगत स्नेहसंबंधामुळे या भागीदारीला आणखी वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Sulochana Pandit: अभिनेत्री आणि पार्श्वगायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन; वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number