Tuesday, March 17, 2026 02:59:52 PM

New Classic Bike: सावधान! रस्त्यावर येतेय शिकार करायला 'Red Wolf'; 'या' कंपनीच्या बाईकने मॉडर्न-रेट्रो मार्केटमध्ये उडवली खळबळ, किंमत फक्त...

यांत्रिक क्षमतेच्या बाबतीतही ही बाइक तितकीच प्रभावी आहे. 350 Alpha2 लिक्विड-कूल्ड (Liquid-Cooled) इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह 29 bhp पॉवर आणि 29.8 Nm टॉर्क निर्माण करते.

new classic bike सावधान रस्त्यावर येतेय शिकार करायला red wolf या कंपनीच्या बाईकने मॉडर्न-रेट्रो मार्केटमध्ये उडवली खळबळ किंमत फक्त

काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, पण क्लासिक मोटरसायकलची ओढ आजही तशीच आहे. 1970 च्या दशकातील येज्दीच्या दमदार परंपरेला आधुनिक अवतार देत ‘रेड वुल्फ’ पुन्हा एकदा रेट्रोची धग पेटवण्यासाठी सज्ज झाली आहे. 1970 च्या दशकातील येज्दीच्या दमदार वारशाला सलाम करत तयार करण्यात आलेली ही बाइक आधुनिक-रेट्रो (Modern-Retro) सेगमेंटमध्ये वेगळा ठसा उमटवण्याच्या इराद्याने आली आहे. दिल्लीतील शोरूम किंमत 2,09,950 रुपये ठेवण्यात आली आहे.

रेड वुल्फची ओळख तिच्या गडद, चमकदार लाल रंगातूनच स्पष्ट होते. क्रोम फिनिशने सजवलेले एग्झॉस्ट, इंजिन आणि हँडलबार तिला रेट्रो एलिगन्स देतात, तर मस्क्युलर फ्युएल टँक आणि रुंद रिअर फेंडर तिच्या आक्रमक व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतात.

बॉबर-स्टाइल मागील डिझाइन आणि ब्राऊन सीटमुळे ही बाइक केवळ प्रवासाचे साधन राहत नाही, तर एक स्टाइल स्टेटमेंट बनते. सिंगल आणि पिलियन दोन्ही रायडिंगसाठी योग्य अशी आसनरचना आणि या सेगमेंटमधील सर्वाधिक रुंद रिअर टायर असल्याचा कंपनीचा दावा तिची उपस्थिती अधिक ठळक करतो.

हेही वाचा: Middle East War: 'माझा मुलगा कुवैतमध्ये अडकलाय...'; रडत-रडत मराठी अभिनेत्रीने घातली मायबाप सरकारला साद, पाहा व्हिडीओ

यांत्रिक क्षमतेच्या बाबतीतही ही बाइक तितकीच प्रभावी आहे. 350 Alpha2 लिक्विड-कूल्ड (Liquid-Cooled) इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह 29 bhp पॉवर आणि 29.8 Nm टॉर्क निर्माण करते. असिस्ट आणि स्लिपर क्लचमुळे गिअर बदलताना अधिक नियंत्रण मिळते. ब्रेकिंगसाठी पुढे 320 mm आणि मागे 240 mm डिस्क ब्रेक्स देण्यात आले असून, ड्युअल-चॅनल ABS (Anti-lock Braking System) सुरक्षिततेची खात्री देते.

12.5 लिटर क्षमतेचा फ्युएल टँक आणि 350 किमीपेक्षा अधिक रेंजचा दावा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आत्मविश्वास वाढवतो. पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे ड्युअल शॉक ॲब्झॉर्बर्स सस्पेन्शनमुळे खराब रस्त्यांवरही स्थिरता टिकून राहते. 795 mm सीट उंची आणि 171 mm ग्राउंड क्लिअरन्स भारतीय परिस्थितीस अनुरूप आहे, तर पुढे दिलेले फुटपेग्स आरामदायी रायडिंग अनुभव देतात.

फीचर्समध्ये LED लाइट्स, ड्युअल एग्झॉस्ट पाइप्स आणि रेट्रो-आधुनिक लूकचा संगम दिसतो. कंपनी चार वर्षे किंवा 50,000 किमीची वॉरंटी देत असून, पाच वर्षांपर्यंतच्या मेंटेनन्स प्लॅनचा पर्याय उपलब्ध आहे. या सेगमेंटमध्ये तिची स्पर्धा Royal Enfield Meteor 350, Honda Hness CB350 आणि Jawa 42 यांच्याशी होणार आहे.

एकूणच, येज्दी रोडस्टर ‘रेड वुल्फ’ ही केवळ स्पेशल एडिशन बाइक नाही, तर वारसा आणि आधुनिकतेचा संतुलित मिलाफ आहे. रेट्रो सेगमेंटमध्ये वाढत्या स्पर्धेत स्वतःची वेगळी छाप सोडण्याचा तिचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. आता बाजारपेठेत रायडर्सची पसंती कोणाकडे झुकते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: Vijay-Rashmika: विजय देवरकोंडा-रश्मिका मंदान्नाचा लग्नानंतर स्तुत्य उपक्रम; तेलंगणातील 44 सरकारी शाळांमधील मुलांचे भविष्य सावरणार


सम्बन्धित सामग्री