Putin On PM Modi Birthday: ‘तुमचे योगदान कमी लेखता येणार नाही…’; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुतिन यांनी दिल्या खास शुभेच्छा

रशियन दूतावासाने गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा हा शुभेच्छा संदेश अधिकृतपणे शेअर केला.

Putin On PM Modi Birthday: ‘तुमचे योगदान कमी लेखता येणार नाही…’; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुतिन यांनी दिल्या खास शुभेच्छा

Putin On PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यातील पंतप्रधान मोदींचे वैयक्तिक योगदान अत्यंत महत्त्वाचे असून ते कधीही कमी लेखता येणार नाही, अशा शब्दांत पुतिन यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. रशियन दूतावासाने गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा हा शुभेच्छा संदेश अधिकृतपणे शेअर केला.

पंतप्रधान मोदींचे जागतिक स्तरावरील स्थान उच्च; पुतिन कडून विशेष कौतुक

आपल्या संदेशात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी नमूद केले की, पंतप्रधान मोदींना भारतातील जनतेकडून जितका आदर मिळतो, तितकेच जागतिक स्तरावरही त्यांना अत्यंत उच्च स्थान प्राप्त आहे. गेल्या आठवड्यात 18 व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेसाठी नवी दिल्ली दौऱ्यावर असताना मिळालेल्या भव्य स्वागताचा उल्लेख करत पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. “मला आणि संपूर्ण रशियन शिष्टमंडळाला भारतात मिळालेले सौहार्दपूर्ण आदरातिथ्य अत्यंत आनंददायी होते,” असे पुतिन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

हेही वाचा – America Tariff Bomb : रशियन तेलामुळे भारताला फटका! करावा लागणार अमेरिकेच्या 100 टक्क्यांपर्यंतच्या आयात शुल्काचा सामना?; नेमकं प्रकरण काय

द्विपक्षीय चर्चा अर्थपूर्ण अन् फलदायी 

नवी दिल्लीतील भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये झालेली चर्चा अत्यंत स्पष्ट, अर्थपूर्ण आणि फलदायी ठरल्याचे पुतिन यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या राजकीय आकलनाचे आणि दूरदृष्टीचे कौतुक करताना ते म्हणाले की, “नेहमीप्रमाणेच तुमच्याशी झालेला संवाद अत्यंत आनंददायी होता. या चर्चेतून तुमची असाधारण राजकीय समज आणि जागतिक दूरदृष्टी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.” येत्या काळात भारत आणि रशिया द्विपक्षीय तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सहकार्याने काम करत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी पुतिन यांचा यशस्वी दिल्ली दौरा

12 आणि 13 सप्टेंबर रोजी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे आयोजित 18 व्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पुतिन यांनी भारताला भेट दिली होती. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ब्रिक्सच्या दोन महत्त्वाच्या सत्रांमध्ये सहभाग घेतला तसेच ‘भारत इनोव्हेट्स’ प्रदर्शनाला भेट दिली. याशिवाय त्यांनी ब्रिक्स बिझनेस फोरमला संबोधित करत द्विपक्षीय व्यापार वाढवण्यावर भर दिला होता. या यशस्वी दौऱ्यानंतर पुतिन यांनी पाठवलेला हा विशेष संदेश दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ करणारा ठरला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number