नवी दिल्ली: ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना माहिती पुरवल्याचा आरोप आहे. तसेच तिच्याबद्दल अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्या प्रकरणी फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाने युट्यूबर ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट निलंबित केले आहे. याप्रकरणी, 17 मे रोजी युट्यूबर ज्योतीला अटक करण्यात आले असून, सध्या ती पोलीस कोठडीत आहे. ज्योती मल्होत्रा इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटांच्या संपर्कात होती, असा आरोप युट्यूबर ज्योती मल्होत्रावर करण्यात आला आहे.
कोण आहे युट्यूबर ज्योती मल्होत्रा?
1 - ज्योती मल्होत्रा ही हरियाणाची ट्रॅव्हल व्लॉगर आणि युट्यूबर आहे जी 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचे यूट्यूब चॅनल चालवते. तिच्या 'ट्रॅव्हलविथजो1' या इंस्टाग्राम हँडलला 1.37 लाख फॉलोअर्स आहेत.
2 - ऑपरेशन सिंदूरपासून भारतीय गुप्तचर संस्था हाय अलर्टवर आहेत. गुप्तचर विभागाने पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली देशाच्या विविध भागातून अनेक लोकांना अटक केली आहे, त्यापैकी एक प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा आहे.
3 - पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे.
4 - दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्ताच्या इफ्तार पार्टीमध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्रा सहभागी झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.
5 - युट्यूबर ज्योतीचे पाकिस्तान कनेक्शन उघडकीस झाला आहे.
6 - पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या मुलीपासून ते विविध सैनिक अधिकाऱ्यांसोबत तिचे जवळचे संबंध उघडकीस आले आहे.
7 - तसेच, युट्यूबर ज्योती मल्होत्राने देशांतर्गत संवेदनशील माहिती पुरवल्याचेही तपासात उघडकीस झाले आहे.
8 - त्यासोबतच, तिने पाकच्या एजंटाला देशातील सुरक्षा स्थळांची माहिती पुरवल्याचे समोर येत आहे.
9 - तिच्याविरोधात अधिकृत गुपिते कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोण आहे दानिश?
2023 मध्ये जेव्हा युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली होती. तेव्हा व्हिसासाठी ज्योती दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात पोहचली होती. यादरम्यान, तिची ओळख येथील डॅनिश उर्फ एहसान-उर-रहीम याच्यासोबत झाली होती. नंतर, या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. तसेच, दानिशच्या मदतीने ती पाकिस्तानमध्ये पोहचली. तिथे येताच ती पाकिस्तानातील गुप्तहेरांच्या संपर्कात आली. तसेच, सऱ्या यात्रेदरम्यान ती पाकिस्तानमधील अली अहसान आणि शाकिर उर्फ राणा शहबाज सारख्या एजंटांच्या संपर्कात आल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीत समोर आले. विविध सोशल अकाऊंटवरून युट्यूबर ज्योती मल्होत्रा एजंटच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.