Most Expensive Potato : बापरे!! 1 किलो बटाट्याची किंमत 1 लाख रुपये; खरेदीसाठी लोक लावतात चक्क रांगा

आशियामध्ये सर्वात महाग बटाटा दक्षिण कोरियात विकला जात असून तिथे 1 किलो बटाट्यासाठी तब्बल 380 रुपये मोजावे लागतात.<br/>

Most Expensive Potato : बापरे!! 1 किलो बटाट्याची किंमत 1 लाख रुपये; खरेदीसाठी लोक लावतात चक्क रांगा

Most Expensive Potato : भारतामध्ये बटाटा हा रोजच्या जेवणातील अत्यावश्यक घटक आहे. 20 ते 30 रुपयांत सहज मिळणाऱ्या या भाज्याची किंमत काही देशांत कल्पनेपलीकडे जाऊन पोहोचली आहे. आशियामध्ये सर्वात महाग बटाटा दक्षिण कोरियात विकला जात असून तिथे 1 किलो बटाट्यासाठी तब्बल 380 रुपये मोजावे लागतात.

हेही वाचा – खड्डे बुजवले पण रस्त्यावरचं डांबर आलं चक्क हातात…; रस्ता दुरूस्तीनंतरचा व्हिडीओ समोर, नागरिकांचा संताप

इतर देशांतील बटाट्याचे दर

आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये बटाटा भारतीय बाजारापेक्षा कितीतरी महाग आहे.

जपान – 255 प्रति किलो
तैवान – 245 प्रति किलो
हाँगकाँग – 235 प्रति किलो
फिलीपिन्स – 225 प्रति किलो
सिंगापूर – 215 प्रति किलो
इंडोनेशिया – 140 प्रति किलो
थायलंड – 135 प्रति किलो
व्हिएतनाम – 90 प्रति किलो
चीन – 85 प्रति किलो
मलेशिया – 80 प्रति किलो

हेही वाचा – OMG! बंगळुरूचा मोमोवाला महिन्याला कमावतो 31 लाख रुपये? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

परंतु, या सर्वांपेक्षा एक देश असा आहे जिथे बटाटा लक्झरी आयटम समजला जातो. जगातील सर्वात महागडा “Le Bonnot” बटाट्यांची किंमत प्रति किलो 1,00,000 आहे. फ्रान्समध्ये मिळणारा Le Bonnot (ले बोनोट) हा जगातील सर्वात दुर्मिळ आणि महागडा बटाटा आहे. त्याची किंमत चक्क एक लाख रुपये किलो आहे, तरीही लोक त्याच्या खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावतात.

या बटाट्यामध्ये विशेष काय?

अत्यंत कमी उत्पादन – वर्षातून फक्त मे-जूनमध्येच बाजारात उपलब्ध
लॉयर प्रदेशातील नोइरमाउटियर बेटावरच लागवड
हाताने शेती – यंत्रांचा वापर जवळपास शून्य
खूप बारीक साल आणि लहान आकार
अतुलनीय चव – हे बटाटे साधे उकडून तूप-मिठासोबत खाल्ले तरी अप्रतिम चव लागते. दरम्यान, Le Bonnot या बटाट्याचे पहिले शेतकरी बेनोइट बोनोट यांच्या नावावरूनच या जातीला हे नाव देण्यात आले. उत्पादनात दरवर्षी चढ-उतार होत असल्याने याच्या किंमतीतही मोठे बदल दिसतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number