8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाराऱ्यांसाठी 5 महत्त्वाच्या घडामोडी; किती वाढणार पगार? वाचा सविस्तर

या आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन, फिटमेंट फॅक्टर आणि विविध भत्त्यांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील 5 महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे आहेत.<br/>

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाराऱ्यांसाठी 5 महत्त्वाच्या घडामोडी; किती वाढणार पगार? वाचा सविस्तर

8th Pay Commission:  8 वा वेतन आयोग हा सध्या 50 लाखांहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय ठरला आहे. या आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन, फिटमेंट फॅक्टर आणि विविध भत्त्यांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील 5 महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे आहेत.

18 महिन्यांची मुदत आणि कामाची प्रगती

8 व्या वेतन आयोगाने आपल्या अंतिम शिफारशी सादर करण्यासाठी निश्चित केलेल्या 18 महिन्यांच्या कालावधीपैकी 9 महिने आधीच पूर्ण झाले आहेत. या काळात आयोगाने प्राथमिक टप्पा यशस्वीरीत्या पार पाडला असून, अंतर्गत आराखडा तयार करणे व विविध कर्मचारी संघटनांकडून (NC-JCM) निवेदने तपासण्याचे काम पूर्ण केले आहे. सध्या विविध राज्ये आणि विभागांच्या प्रतिनिधींशी यावर चर्चा सुरू आहे.

1 जानेवारी 2026 पासून लागू होणार थकबाकी  

आयोगाच्या नियमांनुसार, 8 व्या वेतन आयोगांतर्गत वेतनवाढीची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासूनच मानली जाईल. शिफारशींचा अंतिम अहवाल सादर होण्यास किंवा प्रत्यक्ष अंमलबजावणीस विलंब झाला, तरीही कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासूनचा सर्व फरक आणि थकबाकी एकरकमी दिली जाईल.

फिटमेंट फॅक्टरबाबत महत्त्वाची माहिती

7 व्या वेतन आयोगामध्ये 2.57 इतका फिटमेंट फॅक्टर वापरला गेला होता. कर्मचारी संघटनांनी तो वाढवून 2.86 ते 3.68 करण्याची मागणी केली आहे. तथापि, सरकारी तिजोरीवरील भार आणि बजेटचा समतोल लक्षात घेता, आयोग 2.25 ते 2.57 च्या दरम्यान फिटमेंट फॅक्टर निश्चित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किमान मूळ वेतनात मोठी वाढ

सध्या 7 व्या वेतन आयोगांतर्गत किमान मूळ वेतन 18,000 रुपये प्रति महिना आहे. नवीन 2.25 ते 2.57 चा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास, किमान मूळ वेतन वाढून थेट 40,000 ते 46,000 रुपये प्रति महिना होऊ शकते. याच प्रमाणात निवृत्त कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन 9,000 रुपयांवरून वाढून 20,000 ते 23,000 रुपये होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – Jaggery Price Hike : सणासुदीच्या काळात सामान्यांचे हाल! साखर महागली, आता गुळानेही वाढवली चिंता; एका किलोसाठी लागणार…

भागधारकांशी व्यापक चर्चा

आयोगाने लष्कर, रेल्वे, टपाल विभाग, नागरी सेवा आणि निवृत्त कर्मचारी संघटनांकडून सविस्तर निवेदने मागवली आहेत. नवी दिल्ली, कोलकाता व मुंबई येथील बैठकांवरून महागाईचा दर आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन आयोग नवीन पे मॅट्रिक्स तयार करत आहे. या अंमलबजावणीमुळे 1 जानेवारी 2026 नंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number