8th Pay Commission Arrears Calculation: केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक (Pensioners) सध्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयोगाचा अंतिम अहवाल येण्यास आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास काही काळ उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हा विलंब कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो, कारण अंमलबजावणीच्या तारखेपासून थकबाकीची रक्कम म्हणजेच एरियर (Arrears) एकरकमी मिळणार आहे. विशेषतः लेव्हल 4 ते लेव्हल 7 मधील कर्मचाऱ्यांच्या पदरात लाखोंचा एरियर पडण्याचा अंदाज आहे.
एरियरची गणना कशी केली जाते? भत्त्यांचा समावेश का नाही?
वेतन आयोगाच्या एरियरचे गणित मुख्यत्वे मूलभूत वेतनात (Basic Pay) होणाऱ्या फरकावर आधारित असते. या गणनेत महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि वाहतूक भत्ता (TPTA) यांचा समावेश केला जात नाही.
महागाई भत्ता (DA): महागाईच्या दरानुसार वर्षभरातून 2 वेळा पुन्हा गणना करून लागू केला जातो.
घरभाडे भत्ता (HRA): बेसिक सॅलरीच्या निश्चित टक्केवारीवर ठरवला जातो.
वाहतूक भत्ता (TPTA): निश्चित स्वरूपाचा भत्ता असून DA च्या वाढीनुसार त्यात आपोआप बदल होतो.
त्यामुळे या भत्त्यांचा फरक बाजूला ठेवून केवळ मूळ वेतनातील फरकावरच एरियरची अंतिम रक्कम निश्चित केली जाते.
विविध फिटमेंट फॅक्टरनुसार मिळणारा अंदाजित एरियर
आठव्या वेतन आयोगात कोणता फिटमेंट फॅक्टर लागू होतो, यावर कर्मचाऱ्यांचा पगार अवलंबून असेल. वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरनुसार संभाव्य एरियरचे गणित कसे असू शकते हे जाणून घेऊ..
– 2.15 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास:
लेव्हल 4: 5.87 लाख
लेव्हल 5: 6.69 लाख
लेव्हल 6: 8.14 लाख
लेव्हल 7: 10.33 लाख
– 2.28 फिटमेंट फॅक्टर ठरल्यास:
लेव्हल 4: 6.53 लाख
लेव्हल 5: 7.45 लाख
लेव्हल 6: 9.06 लाख
लेव्हल 7: 11.49 लाख
हेही वाचा – PM Modi On Gold : 'सोने खरेदी करू नका…'; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासीयांना पुन्हा एकदा आवाहन
2.57 फिटमेंट फॅक्टरवर लेव्हल 7 साठी 14.10 लाखांचा जॅकपॉट
जर सरकारने सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच 2.57 हा फिटमेंट फॅक्टर कायम ठेवला, तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि एरियरमध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळेल. या फॅक्टरनुसार लेव्हल 4 कर्मचाऱ्यांना सुमारे 8.01 लाख, लेव्हल 5 ला 9.14 लाख, तर लेव्हल 6 मधील कर्मचाऱ्यांना 11.12 लाखांपर्यंत एरियर मिळू शकतो. सर्वाधिक फायदा लेव्हल 7 कर्मचाऱ्यांना होणार असून त्यांच्या खात्यात तब्बल 14.10 लाखांपर्यंतची रक्कम जमा होऊ शकते. तथापि, हे सर्व आकडे केवळ प्राथमिक अंदाजांवर आधारित असून केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतरच प्रत्यक्षातील रकमेचे चित्र स्पष्ट होईल.
हेही वाचा – Auto-Taxi Fare Price Hike : मुंबईत रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार; आजपासून द्यावे लागणार 'हे' नवीन दर