Palghar News : फळभाज्यांचा ट्रक उलटला तरी लोकं फळं चोरून नेतात; चारोटी पुलावर तर 600 किलो चांदी वाहतूक करणारी व्हॅन उलटली, पुढे काय झालं?…

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर चांदीच्या विटा वाहून नेणारी व्हॅन पलटी झाल्याची घटना घडली आहे.

Palghar News : फळभाज्यांचा ट्रक उलटला तरी लोकं फळं चोरून नेतात; चारोटी पुलावर तर 600 किलो चांदी वाहतूक करणारी व्हॅन उलटली, पुढे काय झालं?…

पालघर : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर चांदीच्या विटा वाहून नेणारी व्हॅन पलटी झाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅनमध्ये तब्बल 600 किलो चांदीच्या विटा होत्या. या चांदीची अंदाजे किंमत 17 कोटी 66 लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून वापी जीआयडीसी येथील मोदी सन्स लिमिटेडकडे ही चांदी नेली जात होती. अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : Gold-Silver Price Today: सराफा बाजारात मोठा उलटफेर! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा

नेमकं काय घडलं 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी पुलावर शुक्रवार, १५ मे रोजी पहाटे भीषण अपघात होऊन ब्रिंक्स कंपनीच्या व्हॅनमधील दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 6.25 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग दरम्यान चारोटी पुलावर गंभीर अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. सकाळी 6.30 वाजता घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुंबईकडून गुजरातकडे जाणारी ब्रिंक्स कंपनीची व्हॅन (क्रमांक MH 48 BM 3001) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील डिव्हायडरवर चढली. त्यानंतर समोरून गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलरला (क्रमांक GJ 39 TA 9242) जोरदार धडक बसली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number