राज्य सरकारसह केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा, महिलांचा, बालकांचा आणि सामान्यांचा विचार करून अनेक योजना अमलात आणल्या. 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरु करण्यात आलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकार प्रत्यक्षात आणली. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मदत देण्यात येते. नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली आहे.
पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. बिहार निवडणुकीत मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शेतकर्यांसाठी हे मोठ गिफ्ट असणार आहे. केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 नोव्हेंबर, 2025 रोजी पीएम-किसान योजनेतंर्गत 21 वा हप्ता जमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. त्याचसोबत उत्तर भारतातील राज्यांमधील अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खचल्याने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली आहे.
यात 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 वा हप्ता जमा केला. या योजनेचा फायदा झाला की नाही हे पाहण्यासाठी लाभार्थ्यांना pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन शेतकरी कॉर्नर या पर्यायावर क्लिक कराव लागेल. त्यानंतर लाभार्थ्यांच्या यादीवर जाऊन तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवावा लागेल. एवढ झाल्यानंतर Get Data वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे पेमेंट स्टेट्स चेक करता येईल.
मात्र ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना योजनेची रक्कम मिळणार नाही. या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी 3.70 लाख कोटींचा लाभ घेता आला आहे. या योजनेत सातत्याने तपासणी सुरू असल्यामुळे अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना योजनेतून बेदखल करता येतं. ही रक्कम शेतकऱ्यांना कृषी उत्पादनं, शिक्षण अथवा आरोग्यासाठी उपयोगी पडते.