Artificial Intelligence: आठवड्यात फक्त तीन दिवस काम? झूमच्या CEOचा मोठा दावा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने मागच्या काही वर्षांत उद्योगविश्वात प्रचंड वेगाने बदल घडवले आहेत.

Artificial Intelligence: आठवड्यात फक्त तीन दिवस काम? झूमच्या CEOचा मोठा दावा

Artificial Intelligence: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने मागच्या काही वर्षांत उद्योगविश्वात प्रचंड वेगाने बदल घडवले आहेत. आज अनेक कंपन्या आपल्या दैनंदिन कामकाजात AI चा वापर करत आहेत. डॉक्युमेंटेशन, कोडिंग, डेटा अॅनालिसिस, कस्टमर सपोर्ट अशा क्षेत्रांमध्ये AI हळूहळू मानवी श्रम कमी करत आहे. यामुळे भविष्यात काम करण्याची पद्धतच बदलून जाईल, असा अंदाज जागतिक पातळीवरील तज्ज्ञ मांडू लागले आहेत.

आठवड्यात पाच दिवस नव्हे, तीन दिवसच काम!
झूमचे सीईओ एरिक युआन यांनी नुकतेच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, येत्या काळात माणसांना पूर्ण आठवडा काम करण्याची आवश्यकता राहणार नाही. AI च्या मदतीने कंपन्यांची उत्पादकता इतकी वाढेल की लोकांना फक्त तीन ते चार दिवस ऑफिसमध्ये हजेरी लावली तरी काम भागेल. “आपण पाच दिवस काम का करतो? जर AI तंत्रज्ञानामुळे तितक्याच वेळेत दुप्पट काम पूर्ण होणार असेल, तर सर्वांना थोडा जास्त मोकळा वेळ मिळालाच पाहिजे,” असे युआन यांनी स्पष्ट केले.

बिल गेट्स आणि अन्य दिग्गजांचंही मत सारखंच
युआन यांच्यापूर्वीच मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांनी असाच अंदाज वर्तवला होता. गेट्स यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की भविष्यात अशी समाजरचना तयार होईल जिथे माणसांना आठवड्यात केवळ तीन दिवस नोकरीसाठी वेळ द्यावा लागेल. उरलेला वेळ लोक आपल्या आवडीनिवडींसाठी, कुटुंबासाठी किंवा वैयक्तिक विकासासाठी वापरू शकतील.

हेही वाचा: Apple iPhone 17 : ॲपलने iPhone 17 सिरीज, iPhone Air सिरीज केली लाँच

AI मुळे नोकऱ्या जातील का?
तंत्रज्ञानातील प्रत्येक मोठ्या बदलासोबत नोकऱ्यांबद्दलची चिंता निर्माण होते. युआन यांनीही मान्य केलं की काही एंट्री-लेव्हलच्या नोकऱ्या AI मुळे कमी होऊ शकतात. उदाहरणार्थ, बेसिक कोड लिहिण्यासाठी कंपन्या AI टूल्सचा आधार घेतील. पण त्याचबरोबर, हे कोड मॅनेज करणारे, AI एजंट्स नियंत्रित करणारे आणि सिस्टम सुरळीत चालवणारे तज्ज्ञ अधिक प्रमाणात लागतील. त्यामुळे रोजगार संपणार नाहीत, तर नवे रोजगारप्रकार उदयाला येतील.

जीवनशैलीत होणार मोठा बदल
AI चा प्रसार फक्त कामकाजापुरता मर्यादित राहणार नाही. हळूहळू हा तंत्रज्ञानाचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनशैलीत दिसेल. घरगुती कामं, आरोग्य व्यवस्थापन, शिक्षण, बँकिंग अशा सर्वच क्षेत्रांत AI मुळे वेळ वाचेल. परिणामी, माणसांना स्वतःसाठी अधिक वेळ मिळेल. “AI जीवन अधिक सोपं, सुलभ आणि संतुलित बनवेल,” असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.

भविष्याच्या कामाचा नवा चेहरा
जगभरातील कॉर्पोरेट संस्कृतीत 'वर्क-लाईफ बॅलन्स' हा शब्द नेहमी चर्चेत असतो. पण प्रत्यक्षात अनेकांना दीर्घ कामाचे तास आणि ताणतणाव सहन करावा लागतो. AI जर खरंच कामाचा भार उचलणार असेल, तर भविष्यात ऑफिस कल्चरचं स्वरूप बदलणार आहे. आठवड्यात तीन किंवा चार दिवस काम आणि बाकीचे दिवस वैयक्तिक जीवनाचा आनंद हा बदल लवकरच वास्तवात उतरू शकतो.

म्हणूनच AI हे फक्त तांत्रिक साधन राहणार नाही, तर ते समाजजीवनाचा एक अविभाज्य भाग होणार आहे. लोकांच्या कामाच्या वेळेत होणारी ही संभाव्य कपात म्हणजेच तंत्रज्ञानामुळे मानवाला मिळणारा ‘क्वालिटी टाइम’ असेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number