EPFO Portal Upgrade: PF धारकांनो लक्ष द्या! UAN ॲक्टिव्हेशनचा नियम बदलला; आता पोर्टलऐवजी ‘या’ ॲपचा करावा लागणार वापर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सुमारे आठवडाभराच्या तांत्रिक अपग्रेडेशननंतर आपले 'युनिफाइड मेंबर पोर्टल' (Unified Member Portal) पुन्हा एकदा सुरू केले आहे.

EPFO Portal Upgrade: PF धारकांनो लक्ष द्या! UAN ॲक्टिव्हेशनचा नियम बदलला; आता पोर्टलऐवजी ‘या’ ॲपचा करावा लागणार वापर

EPFO Portal Upgrade: देशभरातील लाखो नोकरदार आणि भविष्य निर्वाह निधी (EPF) खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सुमारे आठवडाभराच्या तांत्रिक अपग्रेडेशननंतर आपले 'युनिफाइड मेंबर पोर्टल' (Unified Member Portal) पुन्हा एकदा सुरू केले आहे. मात्र, हे पोर्टल सुरू करतानाच ईपीएफओने नियमांमध्ये अत्यंत मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या नव्या बदलानुसार, पीएफ सदस्यांना आता जुन्या पद्धतीप्रमाणे अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला 'युनिव्हर्सल अकाउंट नंबर' (UAN) सक्रिय (Activate) करता येणार नाही. तसेच नवीन यूएएन तयार करण्याची सुविधाही पोर्टलवरून कायमची बंद करण्यात आली आहे.

सेवा सुरक्षित आणि हायटेक करण्यासाठी बदल
डेटाबेसचे एकत्रीकरण आणि पीएफ सॉफ्टवेअर अधिक सुरक्षित करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याचे ईपीएफओने स्पष्ट केले आहे. ऑनलाईन सेवांचा वेग वाढवणे, त्या अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मात्र, थेट पोर्टलवरील पर्याय बंद झाल्यामुळे आता पीएफ खातेधारकांना यूएएन सक्रिय करण्यासाठी केंद्र सरकारच्या 'उमंग' (UMANG) मोबाईल ॲपचा आधार घ्यावा लागणार आहे.

'UMANG' ॲपद्वारे UAN कसे सक्रिय करावे? जाणून घ्या सोपी पद्धत
तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील Google Play Store किंवा Apple App Store वरून UMANG ॲप डाऊनलोड करा.

ॲप ओपन केल्यानंतर त्यामधील 'EPFO Services' या पर्यायावर क्लिक करा.

या विभागात तुम्हाला UAN Services Through Face Auth अंतर्गत UAN Activation हा नवा पर्याय निवडावा लागेल.

हा पर्याय निवडताच, तुम्हाला आधार-आधारित 'फेस ऑथेंटिकेशन' म्हणजेच कॅमेऱ्यासमोर चेहरा आणून पडताळणी पूर्ण करावी लागेल.

स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांचे पालन करून प्रक्रिया सबमिट करताच तुमचा UAN सक्रिय होईल.

हेही वाचा – EPFO New Rules: नोकरदारांसाठी मोठी बातमी! आता फक्त 3 दिवसांत मिळणार PF चे पैसे; 'ऑटो-सेटलमेंट'ची मर्यादा 5 लाखांवर

विसरलेला UAN शोधणे आता झाले अधिक सोपे
एकीकडे यूएएन सक्रिय करण्याचा नियम बदलला असतानाच, दुसरीकडे ज्या सदस्यांचा UAN नंबर हरवला आहे किंवा जे तो विसरले आहेत, त्यांच्यासाठी ईपीएफओने मोठा दिलासा दिला आहे. नवीन प्रणालीमध्ये विसरलेला UAN क्रमांक पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया आधीपेक्षा खूपच सोपी आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचा नंबर त्वरित शोधता येईल आणि पीएफशी संबंधित ऑनलाईन सेवांचा विनाअडथळा लाभ घेता येईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number