Bank Holidays in December 2025: डिसेंबर महिन्यात एकूण 19 दिवस बँका राहणार बंद ; सलग 5 दिवस असणार सुट्टी

डिसेंबर महिन्यात एकूण 19 दिवस बँका बंद राहणार असून, अनेक राज्यांमध्ये स्थानिक सण, उत्सव आणि विशेष दिवसांना अनुसरून अतिरिक्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.<br/>

Bank Holidays in December 2025: डिसेंबर महिन्यात एकूण 19 दिवस बँका राहणार बंद ; सलग 5 दिवस असणार सुट्टी

Bank Holidays in December 2025: डिसेंबर 2025 महिन्यात देशभरातील बँकांची कामकाजाची वेळ नागरिकांना विशेष लक्षात ठेवावी लागणार आहे. या महिन्यात एकूण 19 दिवस बँका बंद राहणार असून, अनेक राज्यांमध्ये स्थानिक सण, उत्सव आणि विशेष दिवसांना अनुसरून अतिरिक्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

या महिन्यातील नियमित सुट्ट्यांमध्ये खालील दिवसांचा समावेश आहे:

रविवार: 7, 14, 21 आणि 28 डिसेंबर
दुसरा शनिवार: 13 डिसेंबर
चौथा शनिवार: 27 डिसेंबर या दिवशी देशातील सर्व बँका बंद राहतील.

हेही वाचा – Quantity Freeze Limit: NSE चा मोठा निर्णय! फिन निफ्टीची फ्रीझ मर्यादा बदलली; 1 डिसेंबरपासून लागू होणार नवा नियम

स्थानिक सणांमुळे राज्यनिहाय बँक बंद

नियोजित सण व स्मृतिदिनांमुळे देशातील विविध राज्यांमध्ये खालील दिवशी बँकांचे कामकाज बंद असेल:

1 डिसेंबर – राज्य स्थापना दिन आणि आदिवासी श्रद्धा दिनानिमित्त अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये सर्व बँका बंद राहतील.

3 डिसेंबर – गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियरचा उत्सव साजरा केला जाईल. या महत्त्वाच्या प्रसंगी 3 डिसेंबर रोजी गोव्यात सर्व बँका बंद राहतील.

12 डिसेंबर – पा तोगन नेंगमिंजा संगमा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेघालयात सर्व बँका बंद राहतील.

18 डिसेंबर – मेघालय – यू सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेघालयात सर्व बँका बंद राहतील.

19 डिसेंबर – गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यात सर्व बँका बंद राहतील.

20 व 22 डिसेंबर – सिक्कीम – लूसोंग/नामसुंग उत्सव

24 डिसेंबर – नाताळच्या पूर्वसंध्येला मिझोरम, नागालँड आणि मेघालयात सर्व बँका बंद राहतील.

25 डिसेंबर – नाताळच्या दिवशी देशभरातील सर्व बँका बंद राहतील.

26 डिसेंबर – नाताळच्या उत्सवासाठी मिझोरम, नागालँड आणि मेघालयात सर्व बँका बंद राहतील.

27 डिसेंबर – नाताळच्या उत्सवासाठी नागालँडमध्ये सर्व बँका बंद राहतील.

30 डिसेंबर – यू किआंग नांगबाह यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेघालयात सर्व बँका बंद राहतील.

तथापी, 31 डिसेंबर 2025 रोजी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला/इमोइनू इरात्पा निमित्त मिझोरम आणि मणिपूरमध्ये सर्व बँका बंद राहतील.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number