Bengaluru: NEET मध्ये अपयशी ठरलेल्या बंगळुरूच्या रिथुपर्णा केएसने अभियांत्रिकी क्षेत्रात आपली छाप सोडत, Rolls-Royce च्या जेट इंजिन मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनमध्ये वार्षिक 72.3 लाख रुपयांची नोकरी मिळवून मोठ नाव कमवलं आहे. मंगळुरूमधील सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये तिच्या सहाव्या सत्रात, रिथुपर्णाने Rolls-Royce मध्ये आठ महिन्यांची कठोर इंटर्नशिप पूर्ण केली, ज्याचा परिणाम डिसेंबर 2024 मध्ये प्री-प्लेसमेंट ऑफर आणि एप्रिल 2025 मध्ये पगार वाढ म्हणून झाला.
NEET पास होण्यापासून इंजिनिअरिंग पर्यंतचा प्रवास
सेंट एग्नेस कॉलेज, मंगलोर येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, रिथुपर्णाने वैद्यकीय क्षेत्रात जाण्याच्या इच्छेने NEET दिली. मात्र तिला सरकारी वैद्यकीय जागा मिळाल्या नाहीत. नंतर तिने रोबोटिक्स आणि ऑटोमेशन अभियांत्रिकीमध्ये 2022 मध्ये CET द्वारे सह्याद्री कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि व्यावहारिक शिक्षण व तांत्रिक शोध स्वीकारला. तिने सुपारी शेतकऱ्यांसाठी रोबोट तयार करणाऱ्या प्रकल्पात काम केले. तथापी, गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पदके जिंकली. तसेच NITK सुरथकलच्या टीमसोबत काम केले आणि दक्षिण कन्नड डीसी फेलोशिपमध्ये भाग घेतला.
इंटर्नशिप आणि नोकरी मिळवण्यापर्यंतचा प्रवास
रिथुपर्णाने पदवीदरम्यान इंटर्नशिप पूर्ण करून Rolls-Royce मध्ये नोकरी मिळवली. जानेवारी 2025 पासून मध्यरात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या कामगिरीमुळे कंपनीने तिचा प्रारंभिक पगार 39.6 लाख रुपयांवरून 72.3 लाख रुपये वार्षिक केला. तिच्या समर्पणामुळे अभ्यासक्रम आणि आंतरराष्ट्रीय मानक आव्हानांमध्ये संतुलन साधत तिला या उच्च पगारासह भूमिका मिळवता आली.
हेही वाचा – SSC Exam 2025: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर, परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली
सातवे सत्र पूर्ण झाल्यानंतर रिथुपर्णा Rolls-Royce च्या टेक्सास जेट इंजिन विभागात सामील होणार असून, ती विभागातील सर्वात तरुणी बनेल. तिचा प्रवास दाखवतो की, अडचणी आणि अपयश कधीही अनपेक्षित आणि फायदेशीर संधींमध्ये रूपांतरित होऊ शकतात.