जर तुम्ही कमी बजेटमध्ये एक चांगला, फिचर्सने परिपूर्ण स्मार्टफोन शोधत असाल, तर 2025 मधील हे दहा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतात. मोठा डिस्प्ले, फास्ट प्रोसेसर, दमदार बॅटरी आणि उत्तम कॅमेरे या सगळ्यांसह हे फोन 10,000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
Redmi 14C 5G – 9,998 रुपये
Stardust Purple रंगात उपलब्ध हा फोन 4GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो. यात 4nm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट, 6.88-inch 120Hz display, 50MP dual camera आणि 5160mAh बॅटरी मिळते. स्टायलिश ‘Starlight’ डिझाइन हा त्याचा आणखी एक प्लस आहे.
iQOO Z10 Lite 5G – 10,498
रुपये Titanium Blue रंगात उपलब्ध असलेला हा फोन Dimensity 6300 5G processor आणि 433K+ AnTuTu score सह येतो. यात 6000mAh battery, IP64 रेटिंग आणि मिलिटरी-ग्रेड शॉक रेसिस्टन्स आहे.
OPPO A3X 5G – 10,499 रुपये
Sparkle Black मधील हा फोन 4GB RAM + 64GB storage, 6.67-inch HD+ display, 120Hz refresh rate आणि 45W SuperVOOC fast charging सपोर्टसह येतो.
POCO M7 5G – 8,999 रुपये
Mint Green रंगात उपलब्ध हा मॉडेल 6GB RAM + 128GB storage, SD4 Gen2 processor, 6.88-inch display, 50MP rear camera, 8MP selfie camera आणि 5160mAh battery देते.
Samsung Galaxy M06 5G – 8,999 रुपये
Sage Green रंगातील हा फोन Dimensity 6300 चिपसेट, 12 5G bands, 25W fast charging, आणि 4 OS upgradesसह येतो. बॉक्समध्ये चार्जर देत नाहीत.
Samsung Galaxy F06 5G – 8,939 रुपये
Bahama Blue मध्ये हा फोन 4GB RAM + 128GB storage, 5000mAh battery, Android 15, 720×1600 display, Bluetooth आणि Wi-Fi सपोर्टसह मिळतो.
Vivo Y19e – 7,999 रुपये
Majestic Green रंगात उपलब्ध हा फोन 13MP + 0.08MP dual camera, 5MP selfie camera, 6.74-inch display, Unisoc T7225 processor, आणि 5500mAh battery (15W charging) देतो.
realme NARZO 80 Lite 4G – 8,299 रुपये
Beach Gold व्हेरिएंटमध्ये हा फोन 6GB RAM + 128GB storage, 6300mAh battery, 7.94mm slim design, 300% Ultra Volume, Pulse Light आणि AI Assist सपोर्ट देतो.
Motorola G35 5G – 10,394 रुपये
Leaf Green रंगातील Motorola G35 5G हा 4GB RAM + 128GB storage, 1080×2400 display, Bluetooth, Wi-Fi आणि USB कनेक्टिव्हिटी तसेच Android 14 सह येतो.
Redmi A4 5G – 9,299 रुपये
Sparkle Purple मधील हा फोन 6GB RAM + 128GB storage, SD 4s Gen 2 processor, 6.88-inch 120Hz display, 50MP dual camera आणि 18W fast chargingची सुविधा देतो.