Travel Credit Card: आजच्या काळात विमान प्रवास ही केवळ लक्झरी राहिलेली नाही, तर ती अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाली आहे. बिझनेस मीटिंग, ऑफिस ट्रिप्स किंवा वैयक्तिक सुट्टी वारंवार फ्लाइटने प्रवास करणाऱ्यांसाठी खर्च कमी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशा वेळी काही खास ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड्स तुमचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर बनवू शकतात.
भारतातील अनेक प्रमुख बँका अॅक्सिस, एचडीएफसी, एसबीआय, अमेरिकन एक्सप्रेस आणि आयसीआयसीआय अशा प्रकारची कार्ड्स देतात, ज्यामुळे विमान तिकिटांवर सवलत, रिवॉर्ड पॉइंट्स आणि मोफत फ्लाइट व्हाउचर मिळतात. चला जाणून घेऊया कोणती कार्ड्स आहेत ‘फ्रिक्वेंट फ्लायर्स’साठी सर्वात फायदेशीर.
1. अॅक्सिस बँक अॅटलास क्रेडिट कार्ड:
हे कार्ड प्रत्येक एअरलाइनसोबत प्रवास केल्यावर ‘EDGE Miles’ च्या स्वरूपात बक्षीस देते. प्रवासाशी संबंधित खर्चावर तुम्हाला 5 EDGE Miles मिळतात, आणि प्रत्येक माइलचे मूल्य एक रुपया मानले जाते. कार्ड सक्रिय केल्यानंतर पहिल्या व्यवहारावर 2500 EDGE Miles चे स्वागत बक्षीस देखील मिळते.2. अमेरिकन एक्सप्रेस प्लॅटिनम ट्रॅव्हल कार्ड:
ज्यांचा वार्षिक खर्च जास्त आहे, त्यांच्यासाठी हे कार्ड अत्यंत फायदेशीर ठरते. ठराविक रकमेच्या खर्चानंतर वापरकर्त्यांना हजारो रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात, जे नंतर ‘प्लॅटिनम ट्रॅव्हल कलेक्शन’ मधून फ्लाइट बुकिंगसाठी वापरता येतात.
हेही वाचा: Hidden Travel Destinations: स्वर्गापेक्षा कमी नाही! भारतातील 5 अद्भुत ठिकाणं जिथे गर्दी नाही, फक्त शांतता आणि निसर्ग
3. एसबीआय माइल्स एलिट कार्ड:
या कार्डद्वारे प्रवास करताना ‘ट्रॅव्हल क्रेडिट्स’ मिळतात. सुरुवातीला 5000 क्रेडिट्स साइन-अप बक्षीस म्हणून दिले जातात. प्रत्येक 200 रुपयांच्या खर्चावर 6 ट्रॅव्हल क्रेडिट्स मिळतात. हे क्रेडिट्स फ्लाइट, हॉटेल किंवा डायरेक्ट बुकिंगमध्ये रूपांतरित करता येतात.
4. एचडीएफसी 6E रिवॉर्ड्स इंडिगो कार्ड:
इंडिगो एअरलाइनच्या प्रवाशांसाठी खास डिझाइन केलेले हे कार्ड, प्रत्येक 100 रुपये खर्चावर 2.5 रिवॉर्ड पॉइंट्स देते. याशिवाय 1500 रुपयांचे मोफत फ्लाइट व्हाउचर मिळते. दरमहा जमा होणारे पॉइंट्स तुमच्या इंडिगो खात्यात थेट जमा होतात, ज्यामुळे प्रवास अधिक फायद्याचा ठरतो.
5. अॅक्सिस बँक होरायझन क्रेडिट कार्ड:
हे कार्ड एअरलाइन वेबसाइटवर किंवा अॅक्सिस ट्रॅव्हल एज प्लॅटफॉर्मवर केलेल्या खर्चासाठी प्रत्येकी 100 मागे 5 EDGE Miles देते. कार्ड सुरू झाल्यानंतर पहिल्या व्यवहारावर 5000 बोनस माइल्सही दिल्या जातात.
हेही वाचा: Longest Train Journey: रेल्वेने Explore करा 13 देश; अवघ्या 21 दिवसांत अनुभवता येईल जगातील सर्वात लांब प्रवास
6. आयसीआयसीआय एमिरेट्स स्कायवर्ड्स कार्ड:
हे कार्ड एमिरेट्स एअरलाइनच्या प्रवाशांसाठी उत्तम पर्याय आहे. प्रत्येक व्यवहारावर स्कायवर्ड्स माइल्स जमा होतात, ज्यांचा वापर फ्लाइट बुकिंगसाठी करता येतो. शिवाय, हे कार्ड लाउंज अॅक्सेससह येते आणि विविध प्रीमियम व्हर्जन्समध्ये उपलब्ध आहे.
जर तुम्ही वारंवार विमान प्रवास करत असाल, तर ही क्रेडिट कार्ड्स तुमच्यासाठी ‘ट्रॅव्हल बडी’सारखी आहेत. योग्य कार्ड निवडल्यास तुम्हाला तिकीट सवलतींसह, रिवॉर्ड्स, व्हाउचर आणि एअर माइल्स मिळू शकतात. प्रवासात बचत तर होईलच, पण प्रत्येक फ्लाइट एक स्मार्ट अनुभव बनेल!