EPFO WhatsApp Service: EPFO ची कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठी भेट; आता व्हॉट्सॲपवर मिळणार PF ची संपूर्ण माहिती

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी मे महिन्यात या उपक्रमाची माहिती दिली होती.

EPFO WhatsApp Service: EPFO ची कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठी भेट; आता व्हॉट्सॲपवर मिळणार PF ची संपूर्ण माहिती

EPFO WhatsApp Service: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्याचे व्यवस्थापन करणे आता अधिक सोपे आणि सुलभ होणार आहे. 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना' (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी WhatsApp-आधारित विशेष सेवा सुरू करण्यावर वेगाने काम करत आहे. या आधुनिक सेवेद्वारे सदस्यांना त्यांच्या खात्याशी संबंधित महत्त्वाची माहिती थेट मोबाईलवर उपलब्ध होईल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी मे महिन्यात या उपक्रमाची माहिती दिली होती. या प्रणालीमुळे सदस्यांचे EPFO वेबसाइट, कॉल सेंटर किंवा प्रादेशिक कार्यालयांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

चॅटबॉटद्वारे मिळतील अनेक महत्त्वाच्या सुविधा

EPFO ची ही नवीन सुविधा डेटाबेसशी जोडलेल्या 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' आधारित चॅटबॉटवर काम करेल. या चॅटबॉटद्वारे सदस्यांना खालील प्रमुख सुविधा मिळतील:

PF शिल्लक व व्यवहार
सदस्य आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम आणि शेवटच्या 5 व्यवहारांचा तपशील पाहू शकतील.

क्लेम आणि KYC स्टेटस
EPF क्लेमची सद्यस्थिती, व्याज जमा झाल्याची माहिती आणि KYC-संबंधित समस्यांवर मदत मिळेल.

UAN व तक्रारी
 युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) बाबतचे प्रश्न सोडवणे आणि सामान्य तक्रारी नोंदवणे शक्य होईल.

अशी असेल WhatsApp सेवेची कार्यपद्धती

ही सेवा अत्यंत सोप्या टप्प्यांत काम करेल. सर्वप्रथम सदस्यांना EPFO च्या अधिकृत WhatsApp क्रमांकावर 'Hello' पाठवावे लागेल. त्यानंतर ही यंत्रणा UAN शी लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी करेल. पडताळणी पूर्ण झाल्यावर प्रादेशिक भाषांमधील पर्यायांची यादी स्क्रीनवर दिसेल. सदस्याने निवडलेल्या पर्यायानुसार AI चॅटबॉट त्वरित अचूक माहिती उपलब्ध करून देईल.

सायबर फसवणुकीपासून राहा सावध

EPFO ने या सेवेची घोषणा केली असली तरी केंद्रीय स्तरावरील चॅटबॉट पूर्णपणे सुरू होणे अद्याप बाकी आहे. जुलै 2026 मध्ये गोवा प्रादेशिक कार्यालयासारख्या काही स्थानिक कार्यालयांनी हेल्पलाईन सुरू केल्या असल्या तरी, अधिकृत 'व्हेरिफिकेशन बॅज' असलेल्या खात्यावरूनच संवाद साधावा.

EPFO ने सदस्यांना बजावले आहे की, कोणतेही अधिकारी फोन, मेसेज किंवा WhatsApp द्वारे UAN पासवर्ड, बँक डिटेल्स, PAN किंवा OTP ची मागणी करत नाहीत. त्यामुळे अज्ञात क्रमांकांवर कोणतीही गुप्त माहिती शेअर करू नये.

हेही वाचा – Farmer Loan Waiver: 5 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफी योजनेची तिसरी यादी 'या' तारखेला होणार जाहीर

सध्या अशा प्रकारे तपासा PF बॅलन्स

नवीन WhatsApp सेवा पूर्णपणे कार्यरत होईपर्यंत सदस्य सध्याच्या सुविधांचा वापर करू शकतात. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा 7738299899 या क्रमांकावर 'EPFOHO UAN' असा SMS पाठवून सहजरीत्या PF बॅलन्स तपासता येतो.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number