Auto Industry Layoffs: मोठी बातमी! गाड्या बनवणारी ‘ही’ प्रसिद्ध कंपनी करणार 1 लाख कर्माचाऱ्यांची हकालपट्टी

विविध आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, कंपनी येत्या काही दिवसांत जवळपास 1 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Auto Industry Layoffs: मोठी बातमी! गाड्या बनवणारी ‘ही’ प्रसिद्ध कंपनी करणार 1 लाख कर्माचाऱ्यांची हकालपट्टी

Auto Industry Layoffs: वाहन उत्पादक क्षेत्रातील दिग्गज जर्मन कंपनी 'फोक्सवॅगन' आगामी काळात आपल्या व्यवसायात आमूलाग्र बदल आणि प्रचंड मोठी छाटणी करण्याची तयारी करत आहे. विविध आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, कंपनी येत्या काही दिवसांत जवळपास 1 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नव्हे तर, उत्पादन खर्च मर्यादित करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कारखाने कायमचे बंद करण्याची आणि व्यावसायिक कामकाजाची पुनर्रचना करण्याची एक व्यापक योजना आखली जात आहे. जर ही प्रस्तावित योजना प्रत्यक्षात आली, तर फोक्सवॅगनच्या संपूर्ण इतिहासातील ही सर्वात मोठी खर्च कपात आणि औद्योगिक पुनर्रचना ठरेल, यात शंका नाही.

फोक्सवॅगनवर का आली ही वेळ?
फोक्सवॅगनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ऑलिव्हर ब्लूम (Oliver Blume) हे कंपनीला जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धाक्षम आणि फायदेशीर बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्याच्या काळात कंपनीला एकाच वेळी अनेक आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेकडून लादण्यात आलेले कडक आयात शुल्क (Tariffs), चीनच्या बाजारपेठेतील वाहनांची घटलेली मागणी आणि युरोपियन बाजारात BYD व Stellantis सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून मिळालेले मोठे आव्हान यामुळे फोक्सवॅगनच्या आर्थिक नफ्यावर प्रचंड ताण आला आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनी आता आपला प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

1 लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार
सध्या फोक्सवॅगन समूहात जगभरात एकूण 6,57,000 कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीने यापूर्वी सन 2030 पर्यंत सुमारे 50,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते; मात्र आता परिस्थिती अधिक आव्हानात्मक बनल्याने या कर्मचारी कपातीचा परिघ थेट 1 लाख कर्मचाऱ्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. दरम्यान, आतापर्यंत कंपनीच्या अंतर्गत प्रक्रियेनुसार सुमारे 28,000 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कंपनी सोडण्यास सहमती दर्शवली आहे.

जर्मनीतील 4 मोठे कारखाने बंद होणार 
खर्च कमी करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून फोक्सवॅगन जर्मनीतील आपले 4 मोठे कारखाने पूर्णपणे बंद करण्याच्या विचारात आहे. यामध्ये ऑडीचा प्रसिद्ध नेकारसल्म कारखाना, तसेच फोक्सवॅगनचे हॅनोव्हर, झ्विकाऊ (Zwickau) आणि एमडेन (Emden) येथील प्लांट्सचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  

हेही वाचा – Apple Price Hike: ॲपलचा ग्राहकांना मोठा झटका! भारतात मॅकबुक आणि आयपॅडच्या किमतीत तब्बल 'इतक्या' रुपयांची वाढ

कामगार संघटना आक्रमक 
फोक्सवॅगन व्यवस्थापनाच्या या संभाव्य आणि धक्कादायक योजनेमुळे कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जर्मनीतील अत्यंत प्रभावशाली मानली जाणारी कामगार संघटना 'आयजी मेटल' आणि कंपनीच्या 'वर्क्स कौन्सिल'ने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number