ताकात माशी, भजीत प्लास्टिक अन् आता कॅन्टीनमध्ये मांजरांचा वावर! BMC कॅन्टीनमधील अस्वच्छतेचा आणखी एक धक्कादायक Video Viral

मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये मांजरांचा मुक्त वावर आणि जेवणातील अन्न खातानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

ताकात माशी, भजीत प्लास्टिक अन् आता कॅन्टीनमध्ये मांजरांचा वावर! BMC कॅन्टीनमधील अस्वच्छतेचा आणखी एक धक्कादायक Video Viral

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही दिवसांपूर्वी ताकात माशी आणि भजीमध्ये प्लास्टिक आढळल्याच्या तक्रारींनंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही कॅन्टीनमधील स्वच्छतेबाबतचे प्रश्न कायम असल्याचे नव्याने समोर आलेल्या व्हिडिओमुळे स्पष्ट झाले आहे. या व्हिडिओमध्ये कॅन्टीन परिसरात मांजरांचा मुक्त संचार दिसत असून, जेवणाच्या प्लेटमधील अन्न मांजर खात असल्याचेही स्पष्टपणे दिसत आहे.ही दृश्ये समोर आल्यानंतर कॅन्टीनमधील अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महापालिकेच्या मुख्यालयात दररोज अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने भोजनासाठी या कॅन्टीनचा वापर करतात. अशा ठिकाणी प्राण्यांचा मुक्त वावर दिसणे ही चिंतेची बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

यापूर्वी अन्नाच्या गुणवत्तेबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत FDA ने कॅन्टीनवर कारवाई केली होती. त्यानंतर सुधारणा होण्याची अपेक्षा होती. मात्र, आता समोर आलेल्या व्हिडिओमुळे स्वच्छतेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, कॅन्टीनच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या नव्या प्रकरणानंतर महापालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number