Thursday, June 11, 2026 09:30:15 PM

CBSE Class 10 Result: निकालाची धाकधूक संपणार! CBSE 10 वीचा निकाल आज जाहीर होणार?; 'या' डायरेक्ट लिंकवर पाहा तुमचे गुण

डिजिलॉकरकडून निकालापूर्वी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे APAAR आयडी नाही, त्यांनी आधीच त्यांचे डिजिलॉकर खाते तयार करून ठेवावे.

cbse class 10 result निकालाची धाकधूक संपणार cbse 10 वीचा निकाल आज जाहीर होणार या डायरेक्ट लिंकवर पाहा तुमचे गुण

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ Central Board of Secondary Education (CBSE) कडून आज दहावीच्या निकालाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत वेळ जाहीर करण्यात आलेली नसली, तरी निकाल आज कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण तपासू शकणार आहेत.

देशभरातील सुमारे 25 लाख विद्यार्थी सध्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा दहावीची परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली होती. दरवर्षी निकालाच्या दिवशी लाखो विद्यार्थी एकाच वेळी संकेतस्थळावर लॉगिन करत असल्याने वेबसाइट मंदावण्याची किंवा बंद पडण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पर्यायी डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थी DigiLocker आणि UMANG App च्या माध्यमातूनही त्यांची डिजिटल मार्कशीट पाहू आणि डाउनलोड करू शकतात. या माध्यमांमुळे वेबसाइटवरील ताण कमी होण्यास मदत होते.

डिजिलॉकरकडून निकालापूर्वी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे APAAR आयडी नाही, त्यांनी आधीच त्यांचे डिजिलॉकर खाते तयार करून ठेवावे, जेणेकरून निकाल जाहीर होताच त्यांची मार्कशीट “Issued Documents” विभागात उपलब्ध होईल.

हेही वाचा: Praful Hinge: विदर्भचा पोट्टा! प्रफुल्ल हिंगेची पदार्पणात धडाकेबाज कामगिरी; पहिल्या ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेऊन रचला इतिहास

APAAR आयडी नसल्यास विद्यार्थी सहजपणे डिजिलॉकरवर खाते तयार करू शकतात. यासाठी www.cbseservices.digilocker.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘Get Started’ वर क्लिक करावे. त्यानंतर शाळेकडून मिळालेला ॲक्सेस कोड आणि आवश्यक माहिती भरावी. मोबाईल क्रमांक OTP द्वारे पडताळून घेतल्यानंतर खाते तयार होते. त्यानंतर निकाल जाहीर झाल्यावर मार्कशीट डिजिलॉकरमध्ये उपलब्ध होईल.

याशिवाय विद्यार्थी खालील प्लॅटफॉर्मवरही निकाल पाहू शकतात; www.results.cbse.nic.in, www.cbse.gov.in, www.results.nic.in, www.results.digilocker.gov.in, www.umang.gov.in

अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी प्रथम www.results.cbse.nic.in उघडावे. त्यानंतर “Secondary School Examination (Class X) 2026” या लिंकवर क्लिक करावे. पुढे रोल नंबर, शाळा क्रमांक, ॲडमिट कार्ड आयडी, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन भरून सबमिट करावे. त्यानंतर स्क्रीनवर मार्कशीट दिसेल. ती डाउनलोड करून प्रिंट काढणे आवश्यक आहे. 

हेही वाचा: Bhushan Pradhan Engagement: गुपचूप साखरपुडा, थेट लग्नाची तारीख जाहीर! भूषण प्रधानच्या पोस्टने चाहत्यांना दिला सुखद धक्का


सम्बन्धित सामग्री