LPG Rules: स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचे नवे निर्देश; ‘या’ भागातील LPG कनेक्शन होणार रद्द

एलपीजी (LPG) सिलिंडरवरील अवलंबित्व टप्प्याटप्प्याने कमी करून पाइपलाइनद्वारे पुरवठा होणाऱ्या नैसर्गिक गॅसला (PNG) प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

LPG Rules: स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचे नवे निर्देश; ‘या’ भागातील LPG कनेक्शन होणार रद्द

LPG Rules : केंद्रातील पेट्रोलियम मंत्रालयाने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्वयंपाकाच्या गॅसपुरवठ्याबाबत मोठे निर्देश दिले आहेत. एलपीजी (LPG) सिलिंडरवरील अवलंबित्व टप्प्याटप्प्याने कमी करून पाइपलाइनद्वारे पुरवठा होणाऱ्या नैसर्गिक गॅसला (PNG) प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. गॅस वितरण यंत्रणा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि डिजिटल बनवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. नवीन 'एलपीजी कंट्रोल ऑर्डर 2026' आणि 'नॅचरल गॅस डिस्ट्रीब्युशन ऑर्डर 2026' अंतर्गत हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

एकाच वेळी दोन कनेक्शन्स ठेवण्यावर पूर्ण बंदी

नव्या नियमांनुसार ज्या भागांमध्ये किंवा गृहनिर्माण संस्थांमध्ये (सोसायट्यांमध्ये) पीएनजी नेटवर्क उपलब्ध झाले आहे, तेथील ग्राहकांना आता एलपीजी सिलिंडरचा वापर सुरू ठेवता येणार नाही. अशा ग्राहकांना एकाच वेळी पीएनजी आणि एलपीजी ही दोन्ही कनेक्शन्स ठेवण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पीएनजीची सुविधा उपलब्ध आहे, त्यांना आपले जुने एलपीजी सिलिंडर कनेक्शन सरेंडर करणे बंधनकारक असणार आहे.

हेही वाचा – Financial Deadline: नंतर अडचणी वाढतील! ऑगस्ट महिना संपण्यापूर्वी पूर्ण करा 'ही' 4 आर्थिक कामे; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

नोटीस मिळूनही पीएनजी न घेतल्यास एलपीजी रद्द होणार

पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ज्या भागात पीएनजी सुविधा पोहोचली आहे तेथील नागरिकांना पीएनजी कनेक्शन घेण्यासाठी प्रशासनाकडून नोटीस दिली जाईल. दिलेल्या मुदतीत ग्राहकाने पीएनजी कनेक्शन न घेतल्यास त्याचे एलपीजी कनेक्शन आपोआप रद्द केले जाईल. मध्य पूर्वेतील अमेरिका आणि इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गॅस वाहतुकीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी आणि देशांतर्गत गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने पीएनजी वापराचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number