ChatGPT policy change: काही वर्षांत डिजिटल जगात एआयचा (Artificial Intelligence) वापर प्रचंड वाढला. मोबाईलमध्ये चॅटबॉट उघडा, प्रश्न टाका आणि मिनिटात उत्तर मिळवा इतका सोपा आणि सरावलेला वापर झाल्यानं अनेक जण एआयला ‘वैयक्तिक सल्लागार’ म्हणून वापरू लागले. पण आता याच गोष्टीवर मोठा बदल आला आहे. लोकप्रिय AI चॅटबॉट ChatGPT ने स्वतःचे नियम बदलले असून, मेडिकल, फायनान्स आणि लीगल विषयांवर स्पेसिफिक सल्ला देणं थांबवलं आहे. नियमांनुसार 29 ऑक्टोबरपासून हा बदल लागू झाला आहे.
याचा अर्थ काय?
आता ChatGPT औषधांची नावे, डोस किती घ्यावा, कोणते टेस्ट करावेत, कुठल्या औषधाने किती फायदा होईल हे सांगणार नाही. तसेच कोर्ट केसची टेंपलेट, ड्राफ्ट, लीगल स्ट्रॅटेजी, पोलिस कम्प्लेन्ट कशी लिहावी, गुंतवणूक कुठे करावी… अशा थेट मार्गदर्शनांचाही शेवट. आता हा चॅटबॉट फक्त 'general principle / बेसिक माहिती' एवढ्यापुरता मर्यादित राहणार. त्यासोबत यूजर्सना प्रत्यक्ष प्रोफेशनल म्हणजे डॉक्टर, वकील किंवा वित्तीय सल्लागाराकडे जावं अशी शिफारसच करणार.
हेही वाचा: Apple Watch: अॅपल वॉचमुळे समजणार उच्च रक्तदाबाची लक्षणे, आता एआय चालवणार तुमची हेल्थ अलर्ट सिस्टम
हा निर्णय अचानक का?
गेल्या काही महिन्यांत काही गंभीर उदाहरणं चर्चेत आली. काही व्यक्तींनी AI ने दिलेल्या उपचार सल्ल्यांवर विश्वास ठेवून स्वतःवर प्रयोग केले आणि त्याचा थेट नकारात्मक आरोग्यावर परिणाम झाला. एका उदाहरणात एका व्यक्तीने ChatGPT ने मिठाच्या ऐवजी सोडियम ब्रोमाइडचं सेवन केल्याने मानसिक त्रास सुरू झाला. दुसऱ्या प्रकरणात एका व्यक्तीला गिळण्यास त्रास होत होता, AI ला विचारलं तर उत्तर आलं की 'हे कॅन्सरचं लक्षण असण्याची शक्यता कमी'. त्या व्यक्तीनं डॉक्टरकडे जाणं पुढे ढकललं आणि नंतर स्टेज ४ कॅन्सर निघालं. अशा घटनांनी स्पष्ट झालं की एआय चॅटबॉटकडून मिळणारं मार्गदर्शन '100% सुरक्षित' नसतं.
डेटावर आधारित अल्गोरिदम माहिती देऊ शकतो, पण मानवी शरीर, न्यायव्यवस्था किंवा गुंतवणुकीसारख्या मुद्द्यांमध्ये प्रत्येक केस स्वतंत्र असते. चुकीचा सल्ला म्हणजे थेट जीवाला धोका किंवा आर्थिक नुकसान हे जगभरातील तज्ज्ञांनी वारंवार अधोरेखित केलं. या पार्श्वभूमीवर नियम कठोर करणे हे OpenAI च्या दृष्टीने सुरक्षित पाऊल मानलं जात आहे.
हेही वाचा: Apple ची नवी Gen AI Siri मार्च 2026 मध्ये येणार; गुगलच्या 'Gemini' मॉडेलची मदत घेण्याची शक्यता!
यापुढे काय?
आता AI चा उपयोग संदर्भ माहिती, बेसिक हेल्थ–सायन्स मेकॅनिझम, कायद्याची 'संकल्पना' किंवा आर्थिक तत्त्वं समजावण्यासाठी करता येईल; पण उपचार / केस ड्राफ्ट / गुंतवणूक मार्ग सांगण्याची भूमिका थेट बंद. AI कन्सल्टंट नाही, हे स्पष्टपणे कंपनीने अधोरेखित केले आहे.
या बदलानं चॅटबॉटचा वापर 'जिज्ञासा / स्टडी टूल' या श्रेणीकडे झुकत आहे. realtime डॉक्टर, वकील, CA यांच्या स्थानावर एआय बसू शकत नाही हे OpenAI ने आता policy level वर नोंदवलं आहे.